जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सोमवारपासून (३ जानेवारी) कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू झाला आहे. द वाँडरर्स स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्याचा गुरुवारी (६ जानेवारी) चौथा दिवस आहे. मात्र, चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वीच पावसाचा अडथळा आल्याने खेळ सुरू होण्यास विलंब झाला आहे. चौथ्या दिवशीच दक्षिण आफ्रिकेने २४० धावांचे आव्हान तीन गडी गमावत पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेेचा कर्णधार डीीन एल्गरने मॅच विनिंग खेळी केली. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह मालिका बरोबरीत आणली.
या सामन्यात अखेरच्या २ दिवसात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १२२ धावांची गरज होती. तसेच भारताला ८ विकेट्स घेण्याची गरज होती. पावसामुळे खेळ उशीरा सुरू झाल्याने चौथ्या दिवशी ३४ षटकांचा खेळ होणार होता.
The covers are off. 👏
The umpires have done their inspection. 👌
Play set to resume by 3:45 PM Local Time (07.15 PM IST) at the Wanderers, if there is no more rain. 👍
A total of 34 overs to be bowled. #TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/NhRzjN3JS7
— BCCI (@BCCI) January 6, 2022
भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७.१५ या वेळेनुसार चौथ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाली. डीन एल्गर व रॅसी वॅन डर डसेनने चांगली सुरुवात केली. दोघांनी कोणतीही जोखीम न पत्करता संघाचा डाव पुढे नेला. डसेनला मोहम्मद शमीने वैयक्तिक ४० धावांवर माघारी धाडले. त्यानंतर एल्गर व टेंबा बवुमा यांनी अखेरपर्यंत किल्ला लढवत संघाला एक अविस्मरणीय विजय मिळवून दिला. कर्णधार एल्गर ९२ तर बवुमा २३ धावांवर नाबाद राहिले. यासह दक्षिण आफ्रिकेने मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.