---Advertisement---

आवेश खानने वडिलांना समर्पित केल्या आपल्या ४ विकेट्स, कारण जाणून तुम्हीही ठोकाल सलाम!

On: शनिवार, जून 18, 2022 9:20 AM
Avesh-Khan
---Advertisement---

भारतीय संघाने शुक्रवारी (दि. १७ जून) बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघाला ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील चौथ्या सामन्यात पराभूत केले. या विजयात दिनेश कार्तिक याच्यासोबतच आवेश खान याचेही मोलाचे योगदान होते. त्याने ४ षटकात १८ धावा देत सर्वाधिक ४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली. ही त्याची आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी खेळलेल्या ५ सामन्यात त्याला फक्त २ विकेट्स घेता आल्या होत्या. २३ धावा देत २ विकेट्स ही त्याची टी२०तील सर्वोत्तम कामगिरी होती. या मालिकेच्या पहिल्या ३ सामन्यात त्याला एकाही विकेटवर आपले नाव कोरता आले नाही. अशात त्याची ही कामगिरी उल्लेखनीय राहिली. या कामगिरीने तो खूपच खुश झाला. त्याने त्याची ही कामगिरी त्याच्या वडिलांना समर्पित केली.

विशेष म्हणजे, आवेश खान (Avesh Khan) याच्या वडिलांचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी त्याने ही कामगिरी केली. सामन्यानंतर बोलताना आवेश म्हणाला की, “मी माझ्या कामगिरीवर खुश आहे. विशेष म्हणजे, आज वडिलांचा वाढदिवस आहे. अशा परिस्थितीत मला माझ्या विकेट्स त्यांना समर्पित करायच्या आहेत.” तो म्हणाला की, “खेळपट्टीवर दुहेरी उसळी होती. त्यामुळे आम्हाला विकेट-टू-विकेट गोलंदाजी करायची होती. त्यात आम्ही यशस्वी झालो. आतापर्यंत आम्ही क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आम्ही ते कायम राखू इच्छितो.”

https://twitter.com/BCCI/status/1537838268603338754

आवेशची १०० टक्के योगदान देण्याची इच्छा
भारतीय संघाने पहिल्या ४ सामन्यात एकाच प्लेइंग इलेव्हनला संधी दिली. प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपल्या खेळाडूंवर विश्वास ठेवला आहे. मालिकेचा अंतिम सामना १९ जून रोजी बंगळुरू येथे होणार आहे. याबाबत बोलताना आवेश म्हणाला की, “आम्ही पुढील सामन्यातही आमचे १००टक्के देऊ आणि मालिका आपल्या नावावर करण्याच्या इराद्याने मैदानावर उतरू.” विशेष म्हणजे, या मालिकेसाठी भारतीय संघाच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली होती. त्यानंतर फक्त केएल राहुल आणि कुलदीप यादव यांना दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडावे लागले होते.

कर्णधाराकडून कार्तिक आणि पंड्याचे कौतुक
सामन्यानंतर कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) याने आपली प्रतिक्रिया दिली. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांच्यातील भागीदारीबद्दल बोलताना पंत म्हणाला, “खरोखर आनंद झाला, दोघांच्या फलंदाजीमुळे गोलंदाजांना दबाव जाणवू लागला होता. तसेच, आमच्या गोलंदाजांनी आपले काम व्यवस्थित पूर्ण केले.” स्वत:च्या कामगिरीबद्दल बोलताना पंत म्हणाला, “मला माझ्या कामगिरीची चिंता नाहीये.”

पंत आतापर्यंत खेळलेल्या ४ सामन्यात मोठी धावसंख्या उभारू शकला नाहीये. त्यामुळे अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

निवडकर्ते साहेब ऐकताय नव्हं! कार्तिकचे तिकीट टी२० विश्वचषकासाठी बुक कराच, भारतीय दिग्गजानेही गायले गुणगान

हार्दिक पंड्याच्या ‘त्या’ सल्ल्यानंतर कार्तिकने झळकावले पहिले- वहिले टी२० अर्धशतक, मालिकेत भारताची बरोबरी

दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाला जबाबदार कोण? केशव महाराजने ‘यांच्या’वर फोडलं अपयशाचं खापर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---