दक्षिण आफ्रिका संघाचा भारत दौरा बुधवार म्हणजेच 28 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील तीन सामन्यांची टी-20 मालिका बुधवारी सुरू होईल. पहिला सामना तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रात्री सात वाजता सुरू होईल. सध्यातरी या सामन्यात नाणेफेक महत्वाची भूमिका पार पडणार, असेच दिसत आहे. याठिकाणची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अधिक अनुकूल असल्याचे दिसते.
खेळपट्टी आणि हवामान अंदाज –
तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड स्टेडियमवर यापूर्वी खेळल्या गेलेल्या सामन्यांचा विचार केला, तर खेळपट्टी फिरकी गोलंदाजांच्या दृष्टीने फायद्याची राहिली आहे. अशात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय संघासाठी योग्य असू शकतो. रात्रीच्या वेळी मैदानात दव पडण्याची शक्यता देखील वर्तवली गेली आहे. अशात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला जिंकण्यासाठी किमान 180 धावा तरी कराव्या लागू शकतात. या मैदानात भारतीय संघाने खेळलेल्या मागच्या पाच सामन्यांचा विचार केला, तर त्यापैकी तीन सामने भारताने जिंकले, तर दोन सामन्यांत संघाला परभव मिळाला आहे. आफ्रिकी संघाची मागच्या पाच सामन्यातील आकडेवारी चांगली आहे. ग्रीनफील्डवर आफ्रिकी संघाने मागच्या पाच सामन्यांपैकी चार सामने जिंकले, तर एका सामन्यात त्यांना पराभव मिळाला आहे.
भारतीय संघाचे प्रमुख खेळाडू हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमार यांना या मालिकून विश्रांती दिली गेली आहे. अशात भारताची अंतिम प्लेइंग इलेव्हन पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असेल. संघासाठी आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत वेगवान गोलंदाजी विभाग चिंतेचा विषय ठरला होता. आता आफ्रिकी संघाविरुद्ध गोलंदाजी विभागात सुधारणा होईल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
IND vs SA | दोन्ही संघात दिसणार ‘काटे की टक्कर’, पाहा संभावित प्लेइंग इलेव्हन
भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेविषयी दक्षिण आफ्रिकी कर्णधाराचे मोठे विधान, पाहा काय म्हणाला बावुमा
केरळ ते मेलबर्न, हवा फक्त किंग कोहलीचीच! विराटच्या भल्यामोठ्या कट आउटचे फोटो व्हायरल