भारत आणि दक्षिण अफ्रिका (sa vs ind test series) यांच्यात जोहान्सबर्गच्या वांडरर्स मैदानावार दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले. सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी मैदानावर खेळाडूंमध्ये वाद आणि संघर्ष पाहायला मिळाला. दुसऱ्या दिवशी कर्णधार केएल राहुल आणि डीन एल्गर यांच्यात वाद झाला, तर तिसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) आणि मार्को जान्सन (marco jansen) यांच्यातील वाद पाहायला मिळाला. त्यानंतर जसप्रीत बुमराहने मारलेल्या षटकाराची विशेष चर्चा होत आहे.
झाले असे की, जान्सन दुसऱ्या डावात सतत बुमराहच्या अंगावर चेंडू टाकत होता. डावाच्या ५४ व्या षटकात जान्सनने बुमराहला शॉर्ट लेंथ गोलंदाजी केली. या षटकातील एक चेंडू बुमराहच्या खांद्याला लागला आणि त्यामुळे तो नाराज झाल्याचे दिसले. बुमराहने खूप प्रयत्न केला, पण बुमराह जान्सनच्या गोलंदाजीवर खेळू शकला नाही.
Whole Dugout Stood And Applauded Jasprit Bumrah's Six 🔥#MumbaiIndians #OneFamily #CricketMeriJaan #JaspritBumrah #INDvsSA pic.twitter.com/Pvw3ON0gOD
— Mumbai Indians Universe (@MIUniverse_IPL) January 5, 2022
जसप्रीत बुमराह आणि जान्सनचा वाद झाल्यानंतर पुढच्या षटकात कगिसो रबाडा (kagiso rabada) गोलंदाजीसाठी आला. जान्सनसोबत झालेल्या वादाचा राग बुमराहने रबाडाच्या गोलंदाजीवर एक अप्रतिम षटकार मारून काढला. या षटकात रबाडाने पहिला चेंडू नो बॉल टाकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर बुमराहने डीप स्केअर लेगच्या दिशने एक अप्रतिम षटकार मारला. बुमराहने मारलेला हा षटकार पाहून भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले. ड्रेसिंग रूममधील विराटसह इतर खेळाडूंनी बुमराहसाठी उभा राहून टाळ्या वाजवल्या. सोशल मीडियावर बुमराहचा हा शॉट आणि ड्रेसिंग रूममधील खेळाडूंच्या प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत.
Whole dugout on their feet to applaud Jasprit Bumrah's six. pic.twitter.com/Ow0OJcK4Qd
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 5, 2022
दरम्यान, या सामन्यातील बुमराहने मारलेला हा पहिला षटकार नव्हता. सामन्याच्या पहिल्या डावात देखील बुमराहने एक अप्रतिम षटकार मारला होता. हा षटकार देखील त्याने कगिसो रबाडाच्या चेंडूवरतीच मारला होता. पहिल्या डावात त्याने मारलेल्या षटकारावर त्याची पत्नी संजना गणेशननेची आलेली खास प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. बुमराहच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत तीन षटकार मारले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
कोरोनामुळे ‘मेगा लिलाव’ ढकलला जाणार पुढे! बीसीसीआय ऑक्शनची तारिख आणि ठिकाण शकते बदलू
मेगा ऑक्शनमध्ये ‘या’ ५ खेळाडूंना सीएसके करेल टार्गेट! एकावर तर असेल कर्णधार धोनीचे बारीक लक्ष
स्टंपमाइकमध्ये कैद झाली मयंक अगरवालची स्लेजिंग; डीन एल्गारला म्हणाला, ‘स्वार्थी कर्णधार’- Video
व्हिडिओ पाहा –