काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दक्षिण अफ्रिकेविरुद्ध आगामी काळात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी (sa vs ind odi series) संघाची घोषणा केली होती. आता या एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकेने देखील त्यांच्या संघाची घोषणा केली आहे. टेम्बा बवुमाच्या हातात दक्षिण अफ्रिका संघाचे नेतृत्व दिले गेले आहे. तर कसोटी क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घेतलेला क्विंटन डी कॉक देखील संघात सामील आहे.
उभय संघातील आगामी एकदिवसीय मालिका १९ जानेवारीपासून सुरू होणार आहे. यासाठी दक्षिण अफ्रिकेने त्यांच्या १७ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. दक्षिण अफ्रिकेच्या ताफ्यात सर्वात महत्वाचे नाव २१ वर्षीय वेगवान गोलंदाज मार्को जेन्सन आहे. जेन्सनने नुकतेच भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातून त्याचे कसोटी पदार्पण केले होते. आता त्याला एकदिवसीय पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एन्रिक नॉर्किए एकदिवसीय मालिकेत देखील पुनरागमन करू शकलेला नाही. त्याला कसोटी मालिकेपूर्वी दुखापत झाली होती.
दक्षिण अफ्रिकेच्या एकदिवसीय संघात जवळपास सर्व महत्वाच्या खेळाडूंना निवडले गेले आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी नेदरलँड्स विरूद्ध एकदिवसीय मालिकेत सहभागी असलेला वेन पार्नेल, सिसांदा मांगला आणि जुबैर हमजा यांनी संघात पुन्हा एकदा स्थान बनवले आहे. ती मालिका कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आली होती. या मालिकेत विश्रांतीवर असलेले कर्णधार बवुमा, डी कॉक आणि कगिसो रबाडा यांच्यासारखे अनुभवी खेळाडूही संघात सामील आहेत.
तत्पूर्वी, सेंचुरियन कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून पराभव मिळाल्यानंतर क्विंटन डी कॉकने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. कसोटी निवृत्तीसोबत असेही सांगितले होते की, तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुढेही खेळणार आहे. अशात आगामी मालिकेत त्याला संघात सामील करून बोर्डने स्पष्ट केले आहे की, कसोटी संघाची साथ सोडली असली, तरीही डी कॉक मर्यादित षटकांमध्ये संघाचा महत्वाचा खेळाडू आहे.
दरम्यान, भारताविरुद्ध खेळली जाणारी तीन सामन्यांची ही एकदिवसीय मालिका दक्षिण अफ्रिकेसाठी महत्वाची ठरणार आहे. कारण, या मालिकेमुळे त्यांना २०२३ विश्वचषकाला थेट पात्र होण्यासाठी गुण मिळणार आहेत.
वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ-
टेम्बा बवुमा (कर्णधार), केशव महाराज (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक, झुबेर हमझा, मार्को जेन्सन, जानेमन मलन, सिसांडा मॅगाला, एडेन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, वेन पार्नेल, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, रॅसी व्हॅन डर डुसेन, काइल वेरेन
महत्वाच्या बातम्या –
युवा राकेशच्या मेहनतीवर पहलने फेरले पाणी; हरियाणाचा गुजरातवर रोमांचक विजय
“टीम इंडिया जोहान्सबर्गमध्येच मालिका जिंकेल”; माजी खेळाडूने व्यक्त केला विश्वास
डी कॉकच्या निवृत्तीने दोन खेळाडूंना बसला धक्का; दिली अशी प्रतिक्रिया
व्हिडिओ पाहा –