IND vs SA: गुरुवारी (दि. 14 डिसेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेचा शेवट झाला. अखेरचा सामना भारताने 106 धावांनी जिंकला. या विजयामुळे भारताने मालिकेत 1-1ने बरोबरी साधली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तसेच, दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेने, तर तिसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला. या मालिकेत भारताच्या युवा खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केले. मग ते बॅटमधून असो, चेंडूतून असो किंवा फिल्डिंगमधून असो. युवा खेळाडूंनी कोणत्याच विभागात निराश केले नाही. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात खेळल्या गेलेल्या या मालिकेत युवा खेळाडूंना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. विशेष म्हणजे, या मालिकेनंतर फिल्डिंग मेडलही देण्यात आले.
फिल्डिंग मेडल परतले
टी20 मालिका बरोबरीत सुटल्यानंतर भारतीय (Team India) युवा खेळाडूंचा आत्मविश्वास आणि संघाची एकजुटता कायम राखण्यासाठी संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये पुन्हा एकदा फिल्डिंग मेडल (Fielding Medal) परतले. खरं तर, नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेदरम्यान ड्रेसिंग रूममध्ये चांगले वातावरण ठेवण्यासाठी खेळाडूंना फिल्डिंग मेडल दिले जात होते. याचा प्रभावही पाहायला मिळाला होता.
संघात या छोट्या बदलांमुळे खूप जास्त एकजुटता आली होती. हे पाहता आता पुन्हा एकदा फिल्डिंग मेडलच्या परंपरेला जोडले आहे. मात्र, यावेळी नव्या अंदाजात जोडले गेले आहे. विश्वचषकात हे मेडल प्रत्येक सामन्यानंतर दिले जात होते, पण आता हे मेडल प्रत्येक सीरिजनंतर दिले जाईल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत कुणी जिंकले मेडल?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर भारतीय फिल्डिंग प्रशिक्षकाने सर्व खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये एका जागी बसवले आणि फिल्डिंग मेडल विजेत्या खेळाडूच्या नावाची घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत हा किताब भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj Fielding Medal) याला मिळाला. सिराजने या मालिकेत सिराजने 2 सामन्यात 1 विकेट घेतली होती. तसेच, उत्कृष्ट क्षेत्ररक्षणही केले होते.
View this post on Instagram
https://twitter.com/ImTanujSingh/status/1735509521286476232
फिल्डिंग मेडलसाठी तीन खेळाडूंना नामांकन मिळाले होते. त्यात सिराजव्यतिरिक्त रिंकू सिंग आणि यशस्वी जयसवाल यांच्या नावाचाही समावेश होता. या दोन्ही खेळाडूंनी या मालिकेत शानदार प्रदर्शन केले होते. मात्र, शेवटी हे मेडल सिराजला मिळाले. (ind vs sa pacer mohammed siraj won fielding medal award in india vs south africa t20i series 2023)
हेही वाचा-
DRS Controversy: दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाची फसवणूक? अपील करूनही अंपायरने दिला नाही डीआरएस, वाचा का?
Rahul Dravid Angry: जयसवालच्या चुकीमुळे शुबमन गिल Out!, संतापलेल्या द्रविडची रिऍक्शन तुफान व्हायरल, Video