भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात चार सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा 3 गडी राखून पराभव केला. अशा स्थितीत या मालिकेत दोन्ही संघ सध्या 1-1 ने बरोबरीत आहेत. मालिकेतील पुढचा सामना आज (13 नोव्होंबर) सेंच्युरियनमध्ये खेळवला जाणार आहे. सुपरस्पोर्ट पार्क येथे हा सामना होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिकेत आघाडी घेईल. या सामन्यात खेळपट्टीची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. अशा परिस्थितीत या सामन्याची खेळपट्टी कशी असेल ते जाणून घेऊया.
सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कच्या खेळपट्टीचे वैशिष्ट्य म्हणजे ते वेगवान गोलंदाजांना मदत करते. येथील खेळपट्टीवर भरपूर उसळी आणि वेग आहे. ज्यामुळे वेगवान गोलंदाजांना त्यांच्या चेंडूंवर अधिक प्रभाव दाखवण्याची संधी मिळते. दक्षिण आफ्रिकेतील इतर खेळपट्ट्यांपेक्षा येथे चेंडू बाऊन्स होतो त्यामुळे ही खेळपट्टी फलंदाजांसाठी आव्हानात्मक असू शकते. हे मैदान वेगवान गोलंदाजांसाठी स्वर्गासारखे आहे. या ठिकाणी अनेक सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजांनी आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार अनेकदा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतो.
सेंच्युरियन सुपरस्पोर्ट पार्कमध्ये अनेक महत्त्वाचे सामने खेळले गेले आहेत. या स्टेडियमच्या टी20 आंतरराष्ट्रीय रेकॉर्डवर एक नजर टाकली तर, या ठिकाणी 14 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 7 सामने जिंकले आहेत आणि लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 7 सामने जिंकले आहेत. याशिवाय, या मैदानावरील मागील पाच सामन्यांतील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 192 धावा आणि दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या 194 धावांची आहे. अशा परिस्थितीत या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळू शकते.
हेही वाचा-
VIDEO: बाॅर्डर-गावसकर मालिकेपूर्वी भारतीय संघ पर्थच्या मैदानावर गाळतोय घाम
भारताचा चॅम्पियन खेळाडू बनला दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक…!
पाकिस्तानच्या 38 वर्षीय खेळाडूने जिंकला आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार