---Advertisement---

बुमराहशी वाद घातल्याने दिग्गजाने जेन्सनला खडसावले; करून दिली ‘त्या’ घटनेची आठवण

On: गुरूवार, जानेवारी 6, 2022 5:03 PM
bumrah-jansen-fight
---Advertisement---

दक्षिण अफ्रिका व भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्गच्या वॉन्डरर्स स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा प्रमुख वेगवान जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) आणि दक्षिण अफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज मार्को जेन्सन ( marco jansen) यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. या वादानंतर जेन्सनला दक्षिण अफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन (dale styen) याने मोलाचा सल्ला दिला आहे.

डेल स्टेनच्या मते जेन्सन अजून लहान आहे आणि त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जास्त अनुभव नाही. स्टेनने जेन्सनला सल्ला दिला आहे की, त्याने बुमराहसोबत वाद घालू नये आणि स्वतःच्या गोलंदाजीवर लक्ष द्यावे. ही घटना दुसऱ्या डावात भारताच्या फलंदाजीवेळ झाली. स्टेनने या दोघांच्या वादाविषयी ट्वीटरवर लिहिले की, ‘जेन्सन मी शपथ घेऊन सांगतो की ही जास्त जुनी गोष्ट नाही. जेव्हा जसप्रीत बुमराह मिस्टर जेम्स अँडरसनला अशाच प्रकारे स्लेज करत होता. अशा प्रकारची स्लेजिंग झेलायला शिक लहान मुला.’

बुमराह आणि जेन्सनमध्ये झालेल्या या वादाचा विचार केला, तर ही घटना भारताच्या डावाच्या ५४ व्या षटकात झाली. या षटकात जेन्सन गोलंदाजीसाठी आला आणि बुमराहच्या अंगावर चेंडू फेकत होता. षटकातील चौथा चेंडू बुमराहच्या खांद्याला लागला आणि जेन्सन त्याच्याकडे रागात पाहू लागला. दुसरीकडे, बुमराह देखील मागे हटला नाही आणि त्याच्याकडे रागात पाहू लागला. यानंतर दोघेही एकमेकांकडे येऊ लागले होते.

दरम्यान, दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या या दुसऱ्या कसोटी सामन्यात सुरुवातील भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने त्यांच्या पहिल्या डावात २०२ आणि दुसऱ्या डावात २६६ धावा केल्या. दुसऱ्या बाजूला दक्षिण अफ्रिकेने पहिल्या डावात २२९ धावा केल्या आणि शेवटच्या डावात विजयासाठी त्यांना २४० धावांचे लक्ष्य मिळाले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण अफ्रिकेने दोन विकेट्सच्या नुकसानावर ११८ धावा केल्या. दक्षिण अफ्रिका संघ विजयापासून अवघ्या १२२ धावांच्या अंतरावर आहे आणि त्यांच्या हातात अजून आठ विकेट्सही आहेत. एकंदरीत पाहता दक्षिण अफ्रिकेचे पारडे या सामन्यात जड दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या –

वर्ष २०२२ चे ३० सर्वात श्रीमंत ऍथलिट्स, यादीत बरीच चकित करणारी नावे; एकाही क्रिकेटरचा मात्र समावेश नाही

यजमान ऑस्ट्रेलिया सिडनी कसोटीत फ्रंटफूटवर; पुनरागमनात ख्वाजाचे दणदणीत शतक

लेकीच्या वाढदिवशी सुरू होणाऱ्या कसोटीपूर्वी विराटची जोरदार तयारी, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

व्हिडिओ पाहा –

डकवर्थ लुईस नियमाला पर्याय ठरणारी भारतीय पद्धत । What Is VJD Method Of Cricket?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---