भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन मागच्या मोठ्या काळापासून संघासोबत आहेत. असे असले तरी, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून त्याने अचानक माघार घेतली. अनेकांना ईशानच्या या निर्णयाचे कारण समजले नाही. पण शुक्रवारी (22 डिसेंबर) त्याने घेतलेल्या या निर्णयामागचे कारण समोर येताना दिसले.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान यष्टीरक्षक फलंदाज भारतीय संघासोबत नसेल. माध्यमांतील वृत्तांनुसार ईशान किशन याने मागच्या आठवड्यात संघ व्यवस्थापनाकडे विश्रांतीसाठी विचारणा केली होती. त्याला संघ व्यवस्थापनाकडून विश्रांती दिली गेली आणि त्याच्या बदली खेळाडूची घोषणाही करण्यात आली. मागच्या एका वर्षात यष्टीरक्षक फलंदाजाचे वेळापत्रक व्यस्त राहिले आहे. एकापाठोपाठ एक मालिका आणि दौरे ईशानने यादरम्यान संघासोबत केले. याच कारणास्तव संघ व्यवस्थापानाने निवडकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर त्याला विश्रांती दिली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला निवडले गेले होते. पण ऐन वेळा माघात घेतल्यामुळे संघाला त्याची सेवा मिळणार नाही.
ईशानने विश्रांती घेण्याचे मुळ कारण
माध्यमांतील वृत्तांवुसार, “ईशानने संघ व्यवस्थापानाला सांगितले की, त्याला मानसिक थकावा जाणवत आहे. याच कारणास्तव त्याला काही काळासाठी क्रिकेटमधून विश्रांती हवी आहे. प्रत्येकाला हे कारण पटले असून त्याच्या निर्णयाला सहमती दर्शवली गेली.”
ईशान किशन 3 जानेवारी 2023 पासून भारतीय संघासोबत आहे. दरम्यानच्या एका वर्षाच्या काळात तो नेहमी उपलब्ध राहिला. आशिया चषक, वनडे विश्वचषक आणि इंडियन प्रीमियर लीगमध्येही त्याने सहभाग घेतला. नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषकातील दोन सामन्यांमध्ये त्याला खेळण्याची संधीही मिळाली. शुबमन गिल याला डेंगू झाल्यामुळे ईशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली होती. तसेच विश्वचषकानंतर झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतही त्याचे प्रदर्शन चांगले राहिले. तीन पैकी दोन सामन्यांमध्ये ईशानने अर्धशतक झळकावले.
बीसीसीआयने सांगितले होते ‘हे’ कारण
भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने ईशानला विश्रांती दिलीची माहिती सर्वांना दिली आहे. बीसीसीआयने सांगितल्याप्रमाणे, “ईशानने वैयक्तिक कारणास्तव दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेण्यासाठी विचारणा केली आहे. त्यामुले या यष्टीरक्षक फलंदाजाला कसोटी मालिकेतून बाहेर गेले जात आहे. त्याच्या जागी केएस भरतला संघात स्थान दिले जाईल.” (IND vs SA The reason behind Ishaan Kishan’s rest has come to light.)
महत्वाच्या बातम्या –
IND vs AUS Test । भारतासाठी चौघांची शानदार अर्धशतके, ऑस्ट्रेलिया पराभवाच्या दिशेने
IND vs SA । संजू सॅमसनचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘मागच्या तीन-चार महिन्यात मानसिक…’