भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (India tour of South Africa) आहे. दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशा बरोबरीवर आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा नियमित कसोटी कर्णधार विराट कोहली पाठीच्या वेदनेमुळे अनुपस्थित होता. त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुलने संघाचे नेतृत्व केले, पण या सामन्यात भारताला सात विकेट्से पराभव मिळाला. उभय संघातील तिसरा कसोटी सामना ११ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळला जाणार आहे. विराट कोहली याच्याकडे तिसऱ्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यापर्यंत विराट कोहली दुखापतीतून सावरेल आणि संघात पुनरागमन करेल अशी दाट शक्यता आहे. अशात विराट जर या सामन्यात खेळला तर एका खास विक्रमाची नोंद करू शकतो. दक्षिण अफ्रिकेत सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत विराट सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात विराटने जर १४ धावा केल्या, तर तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येईल.
विराटने दक्षिण अफ्रिकेत आतापर्यंत सहा कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने ५०.९१ च्या सरासरीने ६११ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने दोन शतक आणि दोन अर्धशतके ठोकली आहेत. दरम्यान, दक्षिण अफ्रिकेविरुद्ध सध्या खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विराटने संघाचे नेतृत्व केले होते आणि यामध्ये पहिल्या डावात ३५ आणि दुसऱ्या डावात १८ धावांची खेळी केली. विराटच्या नेतृत्वात भारताने पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवला आहे.
दक्षिण अफ्रिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकार राहुल द्रविड आहे. द्रविड संघात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत, पण एके काळी तो भारताचा महान कसोटी फलंदाज होता. त्याने दक्षिण अफ्रिकेत ११ कसोटी सामने खेळले आणि यामध्ये २९.७१ च्या सरासरीने ६२४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शतक आणि एक अर्धशतक देखील ठोकले. भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेतील त्यांचा पहिला कसोटी सामना द्रविडच्या नेतृत्वात जिंकला होता.
या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर दक्षिण अफ्रिकेत १५ कसोटी सामने खेळले आणि यामध्ये ४६.४४ च्या सरासरीने सर्वाधिक ११६१ धावा साकारल्या. यामध्ये त्याच्या तीन शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
विराटच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाला इतिहास घवडवण्याची देखील संधी आहे. भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेत आतापर्यंत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. पुढच्या सामन्यात जर भारताने विजय मिळवला, तर भारतीय संघ पहिल्यांदाच दक्षिण अफ्रिकन धरतीवर कसोटी मालिका जिंकेल.
महत्वाच्या बातम्या –
प्रो कबड्डी: फजलच्या मुंबाचा धमाका! तेलगू टायटन्सला केले नामोहरम
‘हे’ दोन खेळाडू अजूनही राहाणार टीम इंडियात कायम, मुख्य प्रशिक्षक द्रविडचे संकेत
PHOTOS: जेसन रॉय दुसऱ्यांदा बनला ‘बाबा’; शेअर केले ‘हॅप्पी’ फॅमिलीचे फोटो