---Advertisement---

IND vs SL, 1st Test: विराट अर्धशतकापासून, तर पंत शतकापासून वंचित; पहिल्या दिवसाखेर भारताच्या ३५० धावा पार

Rishabh-Pant-Ravindra-Jadeja
---Advertisement---

मोहाली। भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात शुक्रवारपासून (४ मार्च) दोन सामन्यांची कसोटी मालिका (Test Series) खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना (1st Test) पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ भक्कम स्थिती आहे. भारताने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात ८५ षटकात ६ बाद ३५७ धावा केल्या आहेत. 

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून रोहित शर्मा आणि मयंक अगरवाल यांनी डावाची सुरुवात केली. त्यांनी चांगली सुरुवात करत अर्धशतकी सलामीही दिली. मात्र, दोघेही फार काळ खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत. दोघांनी ५२ धावांची भागीदारी झाली असताना रोहित २९ धावा करून लहिरू कुमाराच्या चेंडूवर सुरंगा लकमलकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर लगेचच मयंक ३३ धावांवर लसिथ एम्बुल्डेनियाविरुद्ध खेळताना पायचीत झाला.

पण त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या हनुमा विहारी आणि चौथ्या क्रमांकावर आलेल्या विराट कोहलीने भारतीय संघाचा डाव सांभाळला. या दोघांनीही खेळपट्टीवर टिकून खेळताना काही आक्रमक फटके खेळत ९० धावांची भागीदारी केली. त्यांची भागीदारी रंगत असतानाच ४४ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर विराट कोहलीला एम्बुल्डेनियाने त्रिफळाचीत केले. कोहलीने ५ चौकारांच्या मदतीने ७६ चेंडूत ४५ धावा केल्या. त्याने अर्धशतक केवळ ५ धावांनी हुकले.

विराट बाद झाल्यानंतर अर्धशतकी खेळी केलेला हनुमा विहारीही लवकर बाद झाला. विहारीला ५८ धावांवर विश्वा फर्नांडोने त्रिफळाचीत केले. यानंतरही रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी चांगला खेळ केला आणि भारताला २०० धावांच्या पार नेले. पण त्यांचीही जोडी खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर तुटली. श्रेयस अय्यरला धनंजय डी सिल्वाने २७ धावांवर पायचीत पकडले.

पण नंतर पंतने आपल्या तुफानी खेळीची झलक दाखवायला सुरुवात केली. त्याने आक्रमक खेळ केला. बघता बघता तो शतकापर्यंत जाऊन पोहलचा होता, पण त्याचे शतक अगदी थोडक्यात हुकले. त्याला ८१ व्या षटकात सुरंगा लकमलने त्रिफळाचीत केले. पंतने आक्रमक खेळताना ९७ चेंडूत ९६ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ९ चौकार आणि ४ षटकार मारले. यादरम्यान पंतला रविंद्र जडेजाने चांगली साथ दिली होती. पंत आणि जडेजा यांच्यात ६ व्या विकेटसाठी १०४ धावांची शतकी भागीदारी

पंत बाद झाल्यानंतर जडेजाच्या साथीला फलंदाजीसाठी आर अश्विन उतरला. या दोघांनी नंतर पहिल्या दिवसाच्या अखेरीपर्यंत आणखी पडझड होऊ दिली नाही. पहिल्या दिवसाखेर रविंद्र जडेजा ४५ धावांवर आणि आर अश्विन १० धावांवर नाबाद राहिला. आता भारतीय संघ दुसऱ्या दिवशी ६ बाद ३५७ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात करेल.

श्रीलंकेकडून पहिल्या दिवशी लसिथ एब्मुल्डेनियाने २ विकेट्स घेतल्या, तर सुरंगा लकमल, विश्वा फर्नांडो, लहिरू कुमारा आणि धनंजय डी सिल्वाने प्रत्येकी १ विकेट घेतली.

आजी-माजी कर्णधारांसाठी खास सामना
हा सामना रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांसाठी खास आहे. कारण रोहित शर्माचा कसोटी कर्णधार म्हणून हा पहिलाच सामना आहे, तर विराट कोहलीचा कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

…म्हणून ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून उतरले मैदानात, पाकिस्तानविरुद्ध खेळतायेत कसोटी

‘तो दिवस अजूनही आठवतो, जेव्हा विराट पहिल्यांदा माझ्याकडे आलेला’, बालपणीच्या प्रशिक्षकांचा आठवणींना उजाळा

शंभराव्या कसोटीपूर्वी कोहलीचे ‘विराट’ काम, भटक्या जनावरांच्या मदतीसाठी उचलले ‘हे’ पाऊल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---