भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात मोहाली येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. ज्यामध्ये यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतचे शतक होता होता राहिले आहे. रिषभ पंत (Rishabh pant) आपल्या ५व्या आंतरराष्ट्रीय शतकापासून फक्त ४ धावा दूर होता. कसोटी कारकिर्दीत तो पाचव्यांदा नर्वस नाईन्टीजवर (९० ते ९९ धावा) बाद झाला आहे. याबरोबरच एक नकोसा विक्रमही त्याने केला.
त्याने ९७ चेंडूत ४ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ९६ धावा केल्या. याबरोबरच रिषभ पंत भारतात सर्वाधिक कसोटी सामन्यांत नर्व्हस नाईन्टीजचा बळी ठरणारा दुसरा भारतीय ठरला आहे. भारतातील कसोटी सामन्यात पंत चौथ्यांदा नव्वदीत बाद झाला आहे. त्याने याबाबतीत भारतीय फलंदाज सुनील गावसकर यांची बरोबरी केली आहे, तर सचिन तेंडुलकर या यादीत अव्वल क्रमांकावर असून त्याच्यासोबत असे ६ वेळा घडले आहे .
तसेच रिषभ पंतने कसोटीत सर्वाधिकवेळा नर्वस नाईन्टीमध्ये बाद होणारा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज म्हणून एमएस धोनीची बरोबरी केली आहे. माजी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत देखील कसोटीत ५ वेळा नर्वस नाईन्टीजमध्ये बाद झाला होता.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाने पहिल्या दिवसअखेर ६ गडी गमावून ३५७ धावा केल्या आहेत. सलामीच्या जोडीने भारताला चांगली सुरुवात करून दिली. रोहित शर्माने मयंक अगरवालसोबत पहिल्या विकेटसाठी ५२ धावा केल्या. विराट कोहली ४५ धावा करून बाद झाला. रोहित शर्माने २९, तर मयंक अगरवालने ३३ धावा केल्या. ८० धावांपर्यंत भारताने २ विकेट गमावल्या होत्या. येथून विराट कोहलीने हनुमा विहारीसोबत भारताचा डाव सांभाळला. तिसर्या विकेटसाठी दोघांमध्ये ९० धावांची भागीदारी झाली.
कोहली ४५ धावा करून तंबूत परतला, तर हनुमाने ५८ धावा केल्या. रिषभ पंतने रवींद्र जडेजाच्या साथीने सहाव्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी केली. जडेजाने दिवसाअखेर ४५ धावा केल्या आहेत. लसिथ अंबुलडेनियाने श्रीलंकेसाठी २ बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“रोहितला गेल्यावर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत केलेल्या कामगिरीचा पुनरावृत्ती करण्याची गरज”
आयएसएल: जमशेदपूर एफसीचा दणदणीत विजय, ओदिशा एफसीने पराभवाने घेतला निरोप
“शंभराव्या कसोटीची कॅप माझ्या बालपणीच्या हिरोकडून मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट”