रविवारी (दि. 15 जानेवारी) तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडिअम येथे भारत विरुद्ध श्रीलंका संघात तिसरा वनडे सामना खेळला जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघ आधीच आघाडीवर आहे. कारण, भारताने पहिले दोन्ही वनडे सामने जिंकून मालिकेत 2-0ने विजयी आघाडी घेतली आहे. अशात तिसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंका संघाला क्लीन स्वीप करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
भारतीय संघाने पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंका संघाला 67 धावांनी पराभूत केले होते. तसेच, दुसऱ्या वनडेत भारताला 4 विकेट्सने विजय मिळाला होता. तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यासाठी भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ केरळमध्ये पोहोचले आहेत. भारताकडून पहिल्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) याने शतक साजरे केले होते. दुसऱ्या सामन्यात उमरान मलिक आणि कुलदीप यादव यांच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर भारताने विजय मिळवला होता.
Hello Trivandrum 👋🏻
We are here for the 3️⃣rd and final #INDvSL ODI ✅#TeamIndia pic.twitter.com/xzpr7UTCMT
— BCCI (@BCCI) January 13, 2023
आकडेवारीबद्दल बोलायचं झालं, तर भारत आणि श्रीलंका संघात 164 सामने खेळले गेले आहेत. भारताने 95 सामन्यात विजय मिळवला आहे, तर श्रीलंका संघाने 57 सामन्यात विजय मिळवला आहे. फक्त एक सामना बरोबरीत सुटला आहे. तसेच, 11 सामन्यांचा निकाल अनिर्णित राहिला आहे. अशात भारतीय संघ आकडेवारीत आणखी एका विजयाचा समावेश करण्याचा प्रयत्न करेल.
भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघातील तिसऱ्या वनडे सामन्याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया…
भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसरा वनडे सामना कधी खेळला जाईल?
भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसरा वनडे सामना रविवारी (दि. 15 जानेवारी) खेळला जाईल.
भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसरा वनडे केव्हा सुरू होईल?
भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसरा वनडे सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल.
भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसरा वनडे सामना कुठे खेळला जाईल?
भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसरा वनडे सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडिअम येथे खेळला जाईल.
भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसरा वनडे सामना कुठे पाहता येईल?
भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसऱ्या वनडे सामन्याचे प्रसारण दूरदर्शन स्पोर्ट्स चॅनेल, डीडी फ्री डिशवर मोफत होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरही केले जाईल. सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग क्रिकेट चाहते डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहू शकतील. (ind vs sl 3rd odi live streaming india can clean sweep against sri lanka know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित शर्माला हवीये फक्त 1 धाव आणि भारताचा विजय, नावावर होईल धोनी अन् द्रविडलाही न जमलेला विक्रम
शेफाली- श्वेताची झुंज यशस्वी, दक्षिण आफ्रिकेला लोळवत 19 वर्षांखालील विश्वचषकात विजयी सुरुवात