---Advertisement---

IND vs SL: भारतीय खेळाडूंनी मागवले ‘या’ केटरिंगकडून स्वादिष्ट जेवण; ‘मास्टर ब्लास्टर’ही आहे बिर्याणीचा चाहता

On: गुरूवार, फेब्रुवारी 24, 2022 9:22 PM
Team-India-And-Sachin-Tendulkar
---Advertisement---

लखनऊ येथे गुरुवारी (२४ फेब्रुवारी) भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL T20) टी२० सामना खेळला जात आहे. सामन्यापूर्वी भारतीय संघाचा डाएट प्लॅन उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने (UPCA) शेअर केला नाहीये, पण अल आमेन केटरिंग देखील यावेळी खेळाडूंसाठी डिश तयार करत आहे. बुधवार आणि गुरुवारसाठी भारतीय खेळाडूंची विशेष मागणी केटरिंगला मिळाल्याचे केटरिंगचे मालक याहा अमीन यांनी सांगितले.

याहाने सांगितले की, “कानपूरहून मटण निहारी आणि मटण बिर्याणीची ऑर्डर संघ व्यवस्थापनाकडून आली आहे. ही मागणी रोहित शर्मा आणि अन्य दोन खेळाडूंनी केली आहे. गुरुवारी (२४ फेब्रुवारी) संध्याकाळी ड्रेसिंग रूममध्ये निहारी आणि बिर्याणी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. याहा यांनी सांगितले की, ते गेल्या २० वर्षांपासून बीसीसीआय आणि यूपीसीएसाठी जेवण देत आहेत.”

याहा म्हणाले की, “खेळाडू आपल्या देशासाठी खेळतात म्हणूनच आम्हाला त्यांच्या इच्छेनुसार जेवण द्यायला आवडते. यावेळी संघातील सदस्यांच्या बाजूने कोणतीही विशेष मागणी करण्यात आलेली नाही.” याहा यांनी पुढे सांगितले की, “भारतीय क्रिकेट संघाच्या डिशमध्ये गलावटी कबाब शरीफा, कुल्फी जफरानी कोरमा, स्पेशल मटण निहारी आणि मटण बिर्याणी आहे. याशिवाय ऑरेंज, मलाई मक्खन, ब्लॅकबेरी आणि स्ट्रॉबेरी ही भारतीय संघाचे आवडते आहे.”

याहा अमीन म्हणाले, “यावेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अन्य दोन खेळाडूंच्या मागणीवरून बुधवारी (२३ फेब्रुवारी) गलवती कबाब आणि बिर्याणीची मागणी करण्यात आली होती. याशिवाय आम्ही खास व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थ बनवत आहोत. त्यात बरेच काही असेल.”

‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) कानपूरच्या अल अमीनची मटण निहारी आणि बिर्याणीही खूप आवडते. याहा अमीन म्हणाले की, “बऱ्याचदा असे घडते की, सचिन सर माझा एक मित्र लखनऊला येत असल्याचा मेसेज करतात. त्याला निहारी, कबाब आणि मटण बिर्याणी पाठवा असं सांगतात. अगदी अलीकडे म्हणजे डिसेंबर महिन्यात मी त्यांच्यासाठी निहारी पाठवली होती.”

भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. पहिला सामना लखनऊ येथे, तर दुसरा आणि तिसरा सामना धरमशाला येथे पार पडणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

केवळ तिलकरत्ने दिल्शानला जमलेला तसा विक्रम न्यूझीलंडच्या एमीलिया केरने केलाय, तोही भारताविरुद्ध

शेन वॉर्नसाठी सचिन नाहीये ‘गॉड ऑफ क्रिकेट’, पाहा कोणाचं घेतलंय नाव

टी२०मध्ये ७००० धावा अन् २०० विकेट्स! पाकिस्तानी क्रिकेटपटूची छोट्या क्रिकेट प्रकारात मोठी कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---