भारत आणि श्रीलंका यांच्यात 24 फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची टी20 (IND vs SL T20 series) मालिका सुरू होत आहे. भारतीस संघ आता मायदेशात या मालिकेत अनेक विक्रम होणार आहेत. या मालिकेत टी20 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमावर चाहत्यांचे सर्वाधिक लक्ष असणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा हा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. विक्रम पूर्ण करण्यासाठी ‘हिटमॅन’ रोहितला आणखी 12 षटकारांची गरज आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर सध्या 154 षटकार आहेत आणि तो सर्वाधिक 165 षटकार ठोकण्याच्या विक्रमापासून 11 षटकार दूर आहे.
रोहितला हा विक्रम पूर्ण करण्यासाठी तीन संधी असणार आहेत. रोहित शर्मा ज्या फॉर्ममध्ये फलंदाजी करत आहे, त्यामुळे या मालिकेत तो हा विक्रम नक्कीच आपल्या नावावर करेल, अशी अपेक्षा आहे. न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज मार्टिन गप्टिलच्या नावावर सर्वाधिक षटकार आहेत. त्याने 112 सामन्यांमध्ये 165 षटकार ठोकले आहेत. या यादीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा सध्या 122 सामन्यात 154 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
तिसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलचा समावेश आहे. त्याने 79 सामन्यांत 124 षटकार लगावले आहेत. याशिवाय या मालिकेत आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखण्याचे आव्हानही भारतासमोर असेल.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी20 सामना लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मालिकेचा दुसरा सामना 26 आणि 27 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. हे दोन सामने धरमशाला येथे होणार आहेत. यानंतर या दोन संघात कसोटी मालिका खेळली जाणार आहे. भारतीय संघाने नुकतीच वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची टी२० आणि एकदिवसीय मालिका जिंकली आहे.
श्रीलंकेविरुद्ध भारतीय टी20 संघ
रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, आवेश खान.
महत्त्वाच्या बातम्या-
‘सरदार’ बनलेल्या कोहलीला पाहून चाहते क्रेझी, अनुष्काही नव्या लूकमध्ये कॅमेरात कैद; काय आहे प्रकरण?
…तर महिला विश्वचषकात ९ खेळाडूंसह देखील खेळवला जाणार सामना, आयसीसीने केला मोठा बदल
चहल की बुमराह, कोण होणार भारताचा यशस्वी टी२० गोलंदाज? श्रीलंकेविरुद्ध रंगणार ‘कांटे की टक्कर’






