भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याने (Ravindra Jadeja) भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये मोहाली येथे पार पडलेला कसोटी सामना हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात्कृष्ट सामना खेळला. फलंदाजी करताना १७५ धावा केल्या आणि ८७ धावा देत ९ विकेट घेतल्या आहेत. त्याला या कसोटीचा सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. भारताने ही कसोटी १ डाव आणि २२२ धावांनी जिंकली. यावर भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने (Rohit Sharma) आपले मत मांडले आहे.
रविंद्र जडेजाला धावा करण्याची खूप भूक आहे आणि जेव्हा जेव्हा तो मैदानात उतरतो तेव्हा तो संघासाठी चांगली कामगिरी करतो, असे रोहितने म्हटले आहे.
रोहित शर्मा म्हणाला, “रविंद्र जडेजा प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्या खेळीत त्याने नाबाद १७५ धावा करणे आणि ९ विकेट घेणे हे खरेच चांगले आहेत. तो मध्यक्रमात फलंदाजी करत संघासाठी धावा करण्याबरोबरच विकेट सुद्धा घेतो. तो धावा करण्यासाठी खूप भुकेलेला आहे, थोडक्यात तुम्ही पाहू शकाल की ही भूक खेळाडूंना पूढे घेऊन जाण्यास प्रेरित करते आणि मी जडेजामध्ये स्पष्टपणे पाहतो की, तो यशासाठी खूप भूकेलेला आहे, जे संघासाठी खूप चांगले आहे.”
तो पूढे म्हणाला की, “जडेजाच्या फलंदाजी क्षमतेला पूढे घेऊन जायचे आहे. जेव्हा मी त्याच्याबद्दल बोलतो, तो एक खूल्या विचारांचा खेळाडू आहे आणि जबाबदारी घेणे त्याला आवडते. याचा प्रत्येय श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेत दिसला. आम्ही कसोटी मालिकेत त्याला फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर पाठवले होते.”
भारतीय कर्णधार म्हणाला, “मी भारताच्या कित्येक कसोटी सामन्यांचा भाग होतो, जिथे प्रदर्शन ज्या पद्धतीचे होते, तिथे आम्ही खूप धावा केल्या आहेत आणि विरुद्ध संघांना दोन डावांत सामना गुंडाळायले आणि एका डावाने आम्ही सामने जिंकले आहेत. तूम्ही म्हणू शकाल की हा सामना त्यांपैकीच एक आहे.”
आर अश्विनने कपिल देव यांचा ४३४ कसोटी विकेट्सचा विक्रम मोडल्यानंतर त्याचे कौतुक करताना रोहित म्हणाला, “त्याचे क्रिकेट कारकिर्दीत एवढ्या विकेट घेणे ही एक मोठी गोष्ट आहे. जेव्हा तूम्हाला मोठे होऊन कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा असते, तेव्हा तूम्ही या सर्व गोष्टींबाबात स्वप्न पाहत नाही. ही त्याच्यासाठी एक मोठी गोष्ट आहे.” अश्विनने या कसोटीत ४३५ विकेट्स पूर्ण केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
Video: मोहम्मद अझरुद्दीन मुलाचा षटकार पाहून खूश! फ्रेंडशीप कपमध्ये बाप-लेकाच्या जोडीचा धुमाकूळ
नेतृत्त्वात हिट, तर फलंदाजीत फ्लॉप; स्वत:च्या सरासरी प्रदर्शनावर पृथ्वी शॉ म्हणाला, ‘हे ठीक आहे…’
मोहाली स्टेडियम रवींद्र जडेजासाठी लकी! जबरदस्त प्रदर्शनानंतर अष्टपैलूने स्वतः सांगितले कारण