India vs Sri Lanka ODI Series :- भारतीय क्रिकेट संघ शुक्रवार (02 ऑगस्ट) पासून श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मलिकेत कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. दुसरीकडे टी20 मालिकेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी नवनिर्वाचीत कर्णधार चरिथ असलंका याच्या नेतृत्त्वाखाली श्रीलंकेचा संघ मैदानात उतरेल. तत्पूर्वी यजमान संघासाठी मोठी बातमी समोर आली आहे.
भारताविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यापूर्वी श्रीलंका संघाला मोठा झटका बसला आहे. खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्रस्त यजमान संघाचे आणखी दोन वेगवान गोलंदाज, मथिशा पाथिराना आणि दिलशान मदुशंका यांनी मालिकेतून माघार घेतली आहे. पाथीरानाला खांद्याच्या दुखापतीची तक्रार आहे, तर मधुशंका हॅमस्ट्रिंगमुळे त्रस्त आहे.
याबाबत श्रीलंका संघाचे मॅनेजर महिंदा हलागोंडा म्हणाले, “मथिशाच्या खांद्याला दुखापत जाणवत आहे. गेल्या वर्षीच्या विश्वचषकादरम्यान त्याला हीच समस्या झाली होती. त्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही.” पल्लेकेले येथे भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात क्षेत्ररक्षण करताना पाथिरानाला दुखापत झाली होती आणि त्या सामन्यात एकही चेंडू न टाकताच त्याने मैदान सोडले होते.
हा श्रीलंका संघासाठी मोठा धक्का असेल, कारण दुष्मंथा चमीरा देखील श्रीलंकेच्या वनडे संघात नाही, तो आजारपणामुळे बाहेर आहे. नुवान तुषाराही अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्यामुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. हे दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे भारताविरुद्ध टी20 मालिकाही खेळू शकले नाहीत. बिनुरा फर्नांडो देखील फ्लू मधून बरा झाला नाही, त्यामुळे तो देखील निवडीसाठी उपलब्ध होणार नाही. सध्या, श्रीलंकेने उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शिराज आणि इशान मलिंगा यांचा संघात समावेश केला आहे.
🚨 Matheesha Pathirana and Dilshan Madushanka will not take part in the ODI series as the players have sustained injuries. 🚨
Dilshan Madushanka suffered a left hamstring injury (Grade 2), the player sustained during fielding at practices.
Pathirana has suffered a mild sprain on… pic.twitter.com/t5hqtTPdKC— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) August 1, 2024
श्रीलंकेचा वनडे संघ – चरिथ असलंका (कर्णधार), पथूम निसंका, अविष्का फर्नांडो, कुशल मेंडिस, सदीरा समराविक्रमा, कमिंदू मेंडिस, जनिथ लियानागे, निशान, वनिंदू हसरंगा, दुमिथ वेल्लालागे, चमिका करुणारत्ने, महीष थिक्षणा, अकिला धनंजया, इशान मलिंगा, मोहम्मद शिराज, असिथा फर्नाडो.
महत्त्वाच्या बातम्या-
एकच चर्चा- ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या स्वप्निलने कोणती अंगठी घातली होती हातात?
मराठमोळ्या स्वप्निल कुसाळेचं जगभर काैतुक, पंतप्रधान मोदींची कांस्य पदक विजेत्यासाठी खास पोस्ट
मराठी पाऊल पडते पुढे; कोल्हापुरच्या पठ्ठ्याची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गरुड झेप, कांस्य पदकावर कोरलं नाव