येत्या जुलै महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या कालावधीत भारतीय वरिष्ठ संघ इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी सराव करण्यात व्यस्त असणार आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौऱ्यावर शिखर धवन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या मालिकेसाठी अधिकाधिक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तसेच असेही काही खेळाडू आहेत, ज्या खेळाडूंसाठी ही मालिका टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी शेवटची संधी ठरू शकते.
या खेळाडूंसाठी श्रीलंका दौरा अतिशय महत्त्वाचा
येत्या काही महिन्यांत टी-२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे श्रीलंकाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळण्याची संधी मिळू शकते. तसेच असेही काही खेळाडू आहेत, ज्यांना गेल्या काही सामन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. यामध्ये युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार आणि मनीष पांडे यांचा समावेश आहे.
जर हे खेळाडू श्रीलंका दौऱ्यावरही फ्लॉप ठरले तर त्यांचे टी२० विश्वचषक खेळण्याचे स्वप्न तुटू शकते. याबरोबरच टी-२० विश्वचषक स्पर्धेचे तिकीट मिळवण्यासाठी भारतीय संघातील वरिष्ठ आणि नवख्या खेळाडूंमध्ये खेळाडूंमध्ये आपापसाक स्पर्धा रंगताना पाहायला मिळू शकते. (ODI and T20 Series agianst srilnaka is very important for Kuldeep Yadav and yuzvendra chahal)
असा आहे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया
महत्त्वाच्या बातम्या-
ठरलं तर! ‘हाच’ दिग्गज श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघाचा महागुरु, गांगुलीचा शिक्कामोर्तब
पहिलीवहिली कसोटी चॅम्पियनशीप जिंकण्यासाठी ‘या’ ११ खेळाडूंसह भारतीय संघ उतरणार मैदानावर!