भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात मोलाहीच्या मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी (First Test) सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड दिसते आहे. या सामन्याच्या दिवसाचा खेळ (०५ मार्च) संपला असून भारताच्या ५७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ ४ बाद १०८ धावा अशा स्थितीत आहे. अर्थात पाहुणा संघ अजून यजमानांपेक्षा ४६६ धावांनी पिछाडीवर आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याचे शतक थोडक्यात (Rishabh Pant Missed Century) हुकले होते. आता त्याने याबद्दल प्रतिक्रिया दिली (Rishabh Pant On Missing Centuries) आहे.
या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघ १७० धावांवर ३ बाद अशा स्थितीत असताना पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने या क्रमांकावर आपल्या शैलीत फलंदाजी करत ९६ धावा केल्या. ९७ चेंडूंचा सामना करताना ४ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने त्याने ही खेळी केली. मात्र शतकापासून केवळ ४ धावांनी दूर असताना श्रीलंकेचा गोलंदाज सुरंगा लकमलने पंतला त्रिफळाचीत केले होते.
शतक हुकल्यावर काय म्हणाला पंत?
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्टार स्पोर्ट्सवर पंतला त्याची खेळी आणि शतक न पूर्ण करू शकल्याबद्दल प्रश्न विचारले गेले. पंतला आतापर्यंत बऱ्याचदा शतकाच्या जवळ पोहोचूनही काही धावांच्या अंतराने शतक न करता पव्हेलियनला परतावे लागले आहे. यावर त्याला कसे वाटते? असा प्रश्न विचारला गेला. या प्रश्नाचे उत्तर देताना पंत म्हणाला की, मी याविषयी जास्त विचार करत नाही. माझ्यासाठी वैयक्तिक खेळी जास्त महत्त्वपूर्ण नाहीत. कधी कधी मला असे नक्की वाटते की, मी हे शतक करू शकलो असतो. पण मी त्याकडे जास्त लक्ष न देण्यासाठी प्रयत्नशील असतो.
पाचवेळा शतकापासून हुकलाय पंत
दरम्यान पंतने नर्वस नाइंटीजवर (नव्वदीत बाद होणे) बाद होण्याची ही पाचवी वेळ होती. ऑगस्ट २०१८ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा पंत सर्वप्रथम वेस्ट इंडिजविरुद्ध राजकोट येथील कसोटी सामन्यात ९२ धावांवर बाद झाला होता. तर त्याच मालिकेतील हैदराबाद येथील सामन्यातही त्याने ९२ धावांवरच आपली विकेट गमावली होती. त्यानंतर २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे झालेल्या कसोटी सामन्यात फक्त ३ धावांनी त्याचे शतक हुकले होते. तर इंग्लंडविरुद्ध चेन्नईतील कसोटी सामन्यातही तो शतकापासून ९ धावांनी दूर असताना तंबूत परतला होता. त्यानंतर आता श्रीलंकेविरुद्ध तो नर्वस नाइंटीजचा शिकार बनला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
इमाम-उल-हकनंतर आता अझहर अलीनेही ठोकलं शतक; ऑस्ट्रेलिया संघ दबावात
मोठी बातमी! साहाला धमकावणाऱ्या पत्रकाराचं नाव शेवटी कळलंच; बीसीसीआय देणार उत्तरे
रोहित-विराट यांच्यात आहे का वाद? हा व्हिडिओ पाहून मिळेल उत्तर