रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले. जवळपास आठ महिनाभरानंतर तो या फाॅरमॅटमध्ये परतलेला रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले. भारतीय कर्णधाराने 47 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 58 धावांची विस्फोटक खेळी खेळली. या अर्धशतकी खेळीसह रोहित शर्माने भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे.
खरे तर भारतासाठी सलामीवीर म्हणून सर्वाधिक 50 हून अधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. आता रोहित शर्माने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. अनुभवी तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत भारताकडून सलामी करताना 50+ 120 वेळा धावा केल्या आहेत. तर आतापर्यंत ओपनिंग करताना रोहित शर्मानेही 120 वेळा 50+ धावा केल्या आहेत. आता ओपनिंग करताना आणखी एक अर्धशतक केल्यास रोहित शर्मा माजी दिग्गज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक 50+ धावा
सचिन तेंडुलकर- 120
रोहित शर्मा- 120*
सामन्याबाबत बोलायचे झाल्यास भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना बरोबरीत संपला. टीम इंडियाला शेवटच्या 14 चेंडूत विजयासाठी फक्त 1 धावांची गरज होती, पण ती गाठता आली नाही आणि सामन्याचा निकाल बरोबरीत सुटला. सामन्यानंतर रोहित शर्मा खूपच निराश दिसत होता.
या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 50 षटकांत 8 विकेट गमावत 230 धावा केल्या. ड्युनिथ वेलालगेने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळताना 65 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 67 धावा केल्या. त्यानंतर धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला केवळ 230 धावांपर्यंतच मजल मारता आली. टीम इंडिया 47.5 षटकांमध्ये 230 धावांवर ऑलआऊट झाली, त्यामुळे सामना टाय झाला. फलंदाजीत कर्णधार रोहित शर्माने भारतासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने 47 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 58 धावा केल्या.
हेही वाचा-
“हातातला सामना गमावला”, रोहित शर्मानं या खेळाडूवर फोडलं खापर, पाहा कर्णधार नेमकं काय म्हणाला?
लक्ष्य सेनची ‘लक्षवेधी’ कामगिरी, ऑलिम्पिकच्या 128 वर्षांच्या इतिहासात असं करणारा पहिलाच भारतीय!
“एक एकेला टीम इंडिया पर भारी”, श्रीलंकेच्या 21 वर्षाच्या गोलंदाजासमोर भारतीय संघ ढेर!