---Advertisement---

कॅप्टन असावा तर असा! खास शुज चाहत्याला केला भेट, विजयानंतर जिंकली लाखोंची मने

Rohit Sharma
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका यांच्यातील रोमांचक सामना चाहत्यांना गुरुवारी (2 नोव्हेंबर) पाहायला मिळाला. भारतीय संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभी करू शकला. प्रत्युत्तरात गोलंदाजांनी श्रीलंकेला अक्षरशः गुडघ्यावर आणले. 302 धावांचा मोठा विजय भारताने मिळवला. रोहित शर्मा या सामन्यात वैयक्तिक मोठी खेळी करू शकला नाही, पण सामना संपल्यानंतर त्याने चाहत्यांची मने जिंकली.

रोहित शर्मा (Rohit Sharma) नेहमीप्रमाणे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गुरुवारी भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आला. 2 चेंडूत खेळल्यानंतर त्याने चार धावा केल्या आणि विकेट गमावली. भारताला रोहितच्या रुपात पहिला झटका स्वस्तात बसला. पण त्यानंतर विराट कोहली आणि शुबमन गिल यांनी संघासाठी महत्वपूर्ण भागीदारी पार पाडली. दोघांची शतके थोडक्यात हुकली. चौथ्या क्रमांकावर आलेला श्रेयस अय्यर यानेही 82 धावांची महत्वपू्र्ण खेळी केली. भारताने विजयासाठी श्रीलंकेला 358 धावांचे लक्ष्य दिले होते. पण प्रत्युत्तारत श्रीलंका संघ अवघ्या 55 धावांवर सर्वबाद झाला. सामना जिंकल्यानंतर भारताला कर्णधार रोहित शर्मा याने पायातील शुज चाहत्यांना भेट म्हणून दिला.

भारताने विश्वचषक 2023 मधील सलग सातवा विजय गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध मिळवला. मुंबईत झालेल्या या सामन्यात चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद संघाला मिळाला. विजयानंतर कर्णधार रोहित स्टॅन्डकडे पाहून चाहत्यांचे आभार मानताना दिसला. पव्हेलियनमध्ये परत जात असताना त्याने पायातील शूज एका युवा चाहत्याला भेट म्हणून दिल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, उभय संघांतील या सामन्यात गोलंदाजांच्या प्रदर्शनाला विशेष म्हणत्व द्यावे गेले पाहिजे. भारतासाठी मोहम्मद शमी याने 5 षटकांमध्ये 18 धावा खर्च करून 5 विकेट्स घेतल्या. त्याआधी श्रीलंकेसाठी दिलशान मदुशंका याने 10 षटकांमध्ये 80 धावा खर्च करून 5 विकेट्स घेतल्या होत्या. शमीव्यतिरिक्त भारताच्या विजयात मोहम्मद सिराज (3), जसप्रीत बुमराह (1) आणि रविंद्र जडेजा (1) यांनी घेतलेल्या विकेट्सही महत्वाच्या ठरल्या. (Rohit Sharma gifted his shoe to a fan)

महत्वाच्या बातम्या – 
विजयाच्या सप्तपदीनंतर रोहितचे मोठे विधान, म्हणाला, “चेन्नईतून सुरुवात केली आणि आता…”
CWC 2023 पॉइंट्स टेबल: टीम इंडिया सेमी-फायनलमध्ये! 3 स्थानांसाठी आता ‘इतके’ दावेदार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---