रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वात भारतीय संघ सध्या विजयारथावर आरुढ आहे. शनिवारी (२६ फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला. विजयानंतर भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. दरम्यान, रोहित शर्माने भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अलिकडच्या काळात अनेक बदल केल्याचे दिसत आहे. ज्या युवा खेळाडूंना रोहितने संधी दिली ते विश्वासास पात्र ठरले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी दिग्गज फलंदाज मोहम्मद कैफने रोहितचे कौतुक केले आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत विराट कोहली, रिषभ पंत, केएल राहुल असे महत्वाचे खेळाडू विश्रांतीवर आहेत. त्यांच्या जागी श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, ईशान किशन या युवा खेळाडूंना संधी मिळत आहे. शनिवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरने नाबाद ७४ धावा ठोकल्या आणि सामनावीर ठरला. तसेच संजू सॅमसननेही त्याची चांगली साथ दिली.
या सामन्यानंतर सध्या समालोचकाची भूमिका पार पाडणारे मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) यांनी स्वतःच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून ट्वीट करत रोहितच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे. ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले की, “सध्या रोहित शर्मासोबत हात मिळवताना सावध राहा, कारण तो ज्या गोष्टीला हात लावतोय, ती सोनं बनत आहे. श्रेयस अय्यरला तिसऱ्या क्रमांकावर बढत, खेळाडूंचे रोटेशन, गोलंदाजीतील बदल करणे. प्रत्येक पाऊल एक मास्टर स्ट्रोक आहे.” कैफने ट्वीटमध्ये हॅशटॅग गोल्डनटच असेही लिहिले आहे.
Be careful to shake hands with Rohit Sharma these days. Anything he touches turns to gold. Shreyas at No.3, rotation of players, bowling changed. Every move, a master stroke. #Goldentouch @ImRo45
— Mohammad Kaif (@MohammadKaif) February 27, 2022
मागच्या वर्षी श्रीलंका दौऱ्यात भारताला पराभव मिळाला होता, आता श्रीलंकेला दुसऱ्या सामन्यात पराभूत करून भारताने मालिका जिंकली आहे. सोबतच मागच्या वर्षीचा बदलाही घेतला आहे. दुसऱ्या सामन्यात भारतासाठी युवा फलंदाज श्रेयस अय्यरने सर्वाधिक धावा केल्या आणि विजयात महत्वाचे योगदान दिले. संजू सॅमसन (३९) आणि रवींद्र जडेजा (४५) यांची त्याला चांगली साथ मिळाली. सलामीवीर रोहित शर्मा (१) आणि ईशान किशन (१६) स्वस्तात बाद झाल्यानंतर या तिघांनी भारताला विजयापर्यंत पोहोचवले.
महत्वाच्या बातम्या –
मोठ्या मिशा, खांद्यावर रूमाल, आयपीएलपूर्वी ‘रजनीकांत’ स्टाईलमध्ये दिसला धोनी; व्हिडिओ आहे चर्चेत
विश्वचषकापूर्वी घडली हृदयाचा ठोका चुकवणारी घटना, स्म्रीती मंधाना डोक्याला बाउंसर लागून जखमी
कर्णधार रोहित शर्मा म्हणतोय, ‘आत्तापर्यंत आम्ही २७ खेळाडूंना आजमावले आणि अजून…’