वेस्ट इंडीजविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने ३-० अशा विजय मिळवला. आता भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka t20 series) यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना २४ फेब्रुवारीला (गुरुवार) लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाने सरावाला सुरूवात केली आहे.
टी-२० मालिकेतील पहिला सामना लखनऊमध्ये, तर शेवटचे दोन सामने धरमशालामध्ये खेळले जाणार आहेत. भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ पहिल्या सामन्यासाठी लखनऊमध्ये दाखल झाले आहेत. भारतीय संघ सोमवारी (२१ फेब्रुवारी) लखनऊमध्ये दाखल झाला होता, तर श्रीलंका संघ मुंगळवारी (२२ फेब्रुवारी) याठिकाणी पोहोचला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने मंगळवारी सराव सत्रला सुरुवात केली.
मंगळवारी झालेल्या सराव सत्रात कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना खेळाडूंना सल्ले देताना पाहिले गेले. केएल राहुलच्या अनुपस्थितीत ईशान किशन (Ishan Kishan) पुन्हा एकदा रोहितसोबत सलामीसाठी येऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर रोहित आणि ईशानने तब्बल एक तास फलंदाजीचा सराव केला. भारताचे सराव सत्र जवळपास तीन सार चालले. गोलंदाजांमध्ये आवेश खान, कुलदीपप यादव आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी जवळपास ४०-४० मिनिटे नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव केला.
https://twitter.com/BCCI/status/1496112403733676038
भारताच्या सराव सत्रात वेगवान गोलंदाज दीपक चाहर दिसला नाही. दीपक चाहर आणि सूर्यकुमार यादव हे भारतीय संघाचे महत्वाचे खेळाडू श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत. बीसीसीआयने याविषयी अधिकृत माहिती दिली.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात दीपकच्या पायाच्या मांसपेशींमध्ये ताण आल्यामुळे दीपकला मैदानातून बाहेर जावे लागले होते. त्याची दुखापत गंभीर असण्याची सांगितले जात आहे. श्रीलंका संघाचा विचार केला, तर मंगळवारी सकाळी ११ वाजता संघ लखनऊमध्ये पोहोचला आणि सायंकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत त्यांच्या खेळाडूंनी सराव केला.
https://twitter.com/BCCI/status/1496115944971980804
भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, संजू सॅमसन, रितुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, दीपक चाहर, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, मुहम्मद सिराज, यजुवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, आवेश खान, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह.
श्रीलंका संघ :
दसुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, कुशल मेंडिस, चरित असलंका, दिनेश चांदीमल, दनुष्का, कामिल मिशारा, जनीथ लियानागे, वानिंदु हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुष्मंता चमीरा, लाहिरु कुमारा, बिनुरा फनरंडो, शिरन थेकनांडो, महेश तीक्ष्णा, जेफरी वेंडरसे, प्रवीण जयविक्रमा, आसियान डेनियल.






