---Advertisement---

बंगळुरु टेस्ट : डे-नाईट कसोटीमध्ये भारतीय संघाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, ‘या’ यादीत थेट तिसऱ्या स्थानी

On: मंगळवार, मार्च 15, 2022 3:57 PM
Team-India
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका सोमवारी (१४ मार्च) संपली. कसोटी मालिकेतील  दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना १२ मार्चला सुरू झाला आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी भारताने तो जिंकला. सामन्यात भारतीय संघाने तब्बल २३८ धावांनी मोठा विजय मिळवला आणि श्रीलंका संघाला क्लीन स्वीप (२-०) दिला. या विजयासह भारतीय संघाने एका महत्वाच्या यादीत थेट तिसरा क्रमांक पटकावला आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना हा दिवस-रात्र स्वरूपाचा होता, जो गुलाबी चेंडूने खेळला जातो. गुलाबी चेंडूच्या सामन्यात भारताने हा मोठा विजय मिळलवा आहे. गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक धावांनी विजय मिळवण्याच्या बाबतीत भारत आता तिसऱ्या क्रमांकाचा संघ बनला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्याततील हा गुलाबी चेंडूचा कसोटी सामना २३८ धावांच्या फरकाने जिंकला गेला आहे.

या यादीत पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना आहे,  जो २०१९ मध्ये पर्थमध्ये खेळला गेला होता. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात २९६ धावांच्या विजय मिळवला होता होता. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात ऍडलेडला २०२१ मध्ये खेळला गेलेला सामना आहे. या गुलाबी चेंडूच्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने २७५ धावांनी विजय मिळवला होता.

दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेचा विचार केला, तर भारतीय संघाचे प्रदर्शन अप्रतिम राहिले. भारतीय संघाची वरची फळी दोन्ही कसोटी सामन्यातंमध्ये अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही, पण श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा आणि रिषभ पंत या खेळाडूंनी संघाला अपेक्षित धावसंख्या मिळवून दिली. तसेच गोलंदाजीत जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांचे प्रदर्शन कौतुकास पात्र होते.

कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने तब्बल एक डाव आणि २२२ धावांनी  जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्या म्हणजेच गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यात संघाने २३८ धावांनी विजय मिळवला. कसोटी मालिकेत श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्यापूर्वी टी-२० मालिकेतही भारताने सर्वच्या सर्व सामने जिंकले होते.

महत्वाच्या बातम्या –

कोहलीसोबत सेल्फी घेण्यासाठी मैदानावर धावलेल्या फॅन्सबाबत मोठी अपडेट, पोलिसांनी केलीये कडक कारवाई

श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर रिषभ पंतने आपल्या चुकांवर केली मोकळेपणाने चर्चा; म्हणाला, ‘आता…’

विषय गंभीर, कॅप्टन रोहित खंबीर! प्रतिस्पर्ध्यांना व्हाईट वॉशचा दणका देत रचलेत विक्रमांचे मनोरे, वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---