भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिका 2 ऑगस्टपासून सुरू होत आहे. या मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहलीही पुनरागमन करत आहेत. टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावल्यानंतर या दोन्ही दिग्गजांनी या फॉरमॅटला अलविदा केला होता.
आता हे दोन्ही दिग्गज श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहेत. विराट कोहलीला या मालिकेत इतिहास रचण्याची संधी आहे, तर रोहित शर्मा भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला मागे टाकून वनडेत सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू बनू शकतो.
विराट कोहलीने आतापर्यंत 292 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 280 डावांमध्ये 58.67 च्या सरासरीने आणि 93.58 च्या स्ट्राईक रेटने 13848 धावा केल्या आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 152 धावा करून, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14 हजार धावा करणारा दुसरा भारतीय आणि जगातील तिसरा फलंदाज ठरेल. सचिन तेंडुलकरने वनडेमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत.
एकदिवसीय फाॅरमॅटमध्ये सर्वाधिक धावा
सचिन तेंडुलकर: 18426धावा
कुमार संगाकर: 14234 धावा
विराट कोहली: 13848 धावा
रिकी पाँटिंग : 13704 धावा
सनथ जयसूर्या : 13430 धावा
रोहितच्या निशाण्यावर द्रविडचा विक्रम
भारतीय कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत खेळलेल्या 262 एकदिवसीय सामन्यांच्या 254 डावांमध्ये 49.12 च्या सरासरीने आणि 91.97 च्या स्ट्राईक रेटने 10709 धावा केल्या आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 60 धावा केल्याने, तो राहुल द्रविडला मागे टाकेल आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरेल.
वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय
सचिन तेंडुलकर: 18426 धावा
विराट कोहली: 13848 धावा
सौरव गांगुली: 11221 धावा
राहुल द्रविड: 10768 धावा
रोहित शर्मा: 10709 धावा
तत्तपूर्वी, तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत भारतीय संघाने श्रीलंकेचा दारुण पराभव केला आहे. टीम इंडियाने यजमन संघला व्हाईट वाॅश दिला आहे. शेवटच्या अटीतटीच्य सामन्यात भारताने रोमहर्षक विजय मिळवला आहे. या सह गाैतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिल्याच मालिकेला विजयाने सुरुवात झाली आहे.
हेही वाचा-
कसोटी क्रमवारीत मोठे उलटफेर, इंग्लंडचा दिग्गज अव्वल स्थानी विराजमान; रोहितला देखील फायदा
पॅरिस ऑलिम्पिकमधील या व्हायरल फोटोची जगभरात धूम, अवघ्या काही तासांत मिळाले लाखो लाईक्स!
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंचा दबदबा, पीव्ही सिंधूपाठोपाठ लक्ष्य सेनही विजयी