---Advertisement---

T20 WC 2026: सूर्याच्या नेतृत्वात टीम इंडिया यूएसए विरुद्ध भिडणार, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

On: शनिवार, फेब्रुवारी 7, 2026 5:42 AM
---Advertisement---

क्रिकेट चाहत्यांची अनेक महिन्यांची प्रतीक्षा अखेर काही तासांतच संपणार आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारी रोजी सुरुवात होणार आहे. भारतीय संघ गतविजेता आणि यजमान म्हणून विश्वचषकाच्या या १०व्या हंगामात प्रवेश करेल. भारतीय संघ स्पर्धेतील आपला पहिला सामना पहिल्याच दिवशी खेळणार आहे. या सामन्यात भारताचा सामना अमेरिकेशी होणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांनी जोरदार सराव केला आहे. चला तर मग, जाणून घेऊया दोन्ही संघांमधील सामना कोणत्या वेळी सुरू होईल.

भारतीय संघ विरुद्ध अमेरिका हा सामना क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. तर नाणेफेक संध्याकाळी 6.30 वाजता होईल. सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर उपलब्ध असेल. शिवाय जिओसिनेमा (JioCinema) ॲपद्वारे टीव्ही/मोबाईल/लॅपटॉपवर थेट पाहता येईल.

भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा खेळणार आहे. या सामन्यात सूर्यकुमार कर्णधार म्हणून विश्वचषकात पदार्पण करेल. वानखेडे स्टेडियम हे सूर्यकुमारचे घरचे मैदान देखील आहे. त्यामुळे, घरच्या मैदानावर स्थानिक खेळाडू सूर्यकुमार कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे बारीक लक्ष असेल. दुसरीकडे, अमेरिकेच्या संघाचे नेतृत्व मोनांक पटेल करत आहे.

दरम्यान, भारत ‘अ’ संघाने सराव सामन्यात अमेरिकेचा 38 धावांनी पराभव केला. 239 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेला केवळ 200 धावा करता आल्या. त्यामुळे, भारतीय संघ अमेरिकेला कमी लेखण्याची चूक करणार नाही. तर, मुख्य भारतीय संघाविरुद्ध अमेरिका कशी कामगिरी करते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---