वेस्ट इंडिज संघाच्या अवघ्या 115 धावांच्या आव्हानाचा पाठलाग भारतीय संघाने 22.5 षटकात यशस्वीरीत्या केला. यासह भारताने 5 विकेट्सने पहिला वनडे सामना खिशात घातला. या विजयामुळे भारतीय संघाने मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. भारतीय संघाने हा विजय मिळवण्यासोबतच अनेक विक्रमांनाही गवसणी घातली. वेस्ट इंडिजविरुद्धचा हा भारतीय संघाचा सलग 9वा वनडे विजय ठरला. चला तर, सामन्यात रचले गेलेले इतर विक्रमही जाणून घेऊयात…
वनडेत भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची दुसरी सर्वात कमी धावसंख्या
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघाविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज संघाचा डाव फक्त 23 षटकात 114 धावांवर संपुष्टात आला. वनडे क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी 2018साली तिरुवनंतपुरम येथे खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात भारताने वेस्ट इंडिज संघाला अवघ्या 104 धावांवर सर्वबाद केले होते.
तब्बल 26 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत
भारताविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात बनवलेली 114 धावसंख्या ही वेस्ट इंडिजची मायदेशातील भारताविरुद्धची सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी 1997मध्ये भारताविरुद्ध खेळताना वेस्ट इंडिज संघ पोर्ट ऑफ स्पेन येथे 121 धावसंख्येवर सर्वबाद झाला होता. अशाप्रकारे भारतीय गोलंदाजांनी 26 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.
भारताचा दुसरा मोठा विजय
वेस्ट इंडिज संघाचे 115 धावांचे आव्हान भारतीय संघाने 23व्या षटकातच 5 विकेट्सच्या मोबदल्यात 118 धावा करत पार केले. वनडे क्रिकेटच्या इतिहासात 5 विकेट्स पडल्यानंतर चेंडू शिल्लक राहण्याच्या बाबतीत हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. भारतीय संघाने 163 चेंडूं शिल्लक ठेवत सामना जिंकला. यापूर्वी 2013मध्ये श्रीलंका संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 180 चेंडू शिल्लक ठेवत सामना जिंकला होता.
भारताविरुद्ध वनडेत वेस्ट इंडिजची सर्वात कमी धावसंख्या
104- तिरुवनंतपुरम (2018)
114- ब्रिजटाऊन (2023)*
121- पोर्ट ऑफ स्पेन (1997)
123- कोलकाता (1993)
126- पर्थ (1991)
फिरकीपटूंच्या जोरावर भारताचा विजय
नाणेफेक गमावून फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना 23 षटकात 114 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या होत्या. भारतासाठी फिरकीपटूंनी एकूण 7 विकेट्स घेतल्या. यामध्ये 4 विकेट्स या कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याच्या होत्या, तर उर्वरित 3 विकेट्स या रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने घेतल्या होत्या. आव्हानाचा पाठलाग करताना भारतासाठी ईशान किशन याने अर्धशतकी खेळी साकारली. त्याने 46 चेंडूत 52 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये 1 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. किशनच्या जोरावर भारताने हा सामना 5 विकेट्सने नावावर केला. (ind vs wi 1st odi team india beat west indies for 9th consecutive time in odis know what other records here)
महत्त्वाच्या बातम्या-
अर्रर्र! शार्दुलची ‘ती’ चूक अन् विंडीजला फायदा, कर्णधार रोहितने लाईव्ह सामन्यातच केला बाजार, Video Viral
बॅटिंग न करताही विराटने लुटली मैफील, एका हाताने कॅच पकडत फलंदाजाला दाखवला तंबूचा रस्ता- व्हिडिओ