---Advertisement---

तिसऱ्या क्रमांकावर गिलची चिरफाड, दिग्गजांचा सल्ला घेऊनही सपशेल फ्लॉप; अवघ्या 6 धावांवर परतला तंबूत

On: शुक्रवार, जुलै 14, 2023 8:53 AM
Shubman-Gill
---Advertisement---

वेस्ट इंडिजविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी जेव्हा भारतीय संघ घोषित झाला, तेव्हा देशभरात खळबळ माजली होती. कारण, कसोटी तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजारा याला संघातून वगळण्यात आले होते. त्याच्या जागी निवडकर्त्यांनी नवख्या यशस्वी जयसवाल याला संधी दिली. यशस्वीने या संधीचं सोनं करत पदार्पणातच शतक ठोकलं. तसेच, त्याने कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी 200हून अधिक धावांची भागीदारीही रचली. तसेच, रोहितनेही पुढे शतक केले. मात्र, जेव्हा रोहित बाद झाला, तेव्हा शुबमन गिल याच्याकडून खूप अपेक्षा होता. या अपेक्षा पूर्ण करण्यात तो अपयशी ठरला.

शुबमन गिल फ्लॉप
खरं तर, भारतीय संघाचा स्टार फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) वेस्ट इंडिजविरुद्धच्या डॉमिनिका कसोटी (Dominica Test) सामन्यात अवघ्या 6 धावात तंबूत परतला. तो बाद झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले. काही चाहत्यांनी असेही म्हणत खिल्ली उडवली की, द्रविडचा सल्लाही गिलच्या कामी आला नाही. याव्यतिरिक्त तो बाद झाल्यामुळे अनेकांना वाईटही वाटले. एकाने त्याच्या जागी ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याला खेळवले पाहिजे का? किंवा गिलला आणखी एक संधी दिली पाहिजे का असा प्रश्नही विचारला.

झाले असे की, जोमेल वॉरिकन भारताच्या डावातील 79वे षटक टाकत होता. या षटकातील ऑफ स्टम्पच्या जवळ जाणारा पाचवा चेंडू गिलने खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू थोडा वळला आणि बॅटची कड घेत दुसऱ्या स्लीपमध्ये थांबलेल्या ऍलिक अथानाजे याच्याकडे गेला. अशाप्रकारे वॉरिकनला पहिली विकेट मिळाली. त्यामुळे गिलला 11 चेंडूत 1 चौकारासह 6 धावांवर तंबूत परतावे लागले.

खरं तर, शुबमन गिल याने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) याच्याकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याविषयी चर्चा केली होती. त्याने म्हटले होते की, त्याला तिसऱ्या स्थानी फलंदाजी करायची आहे. यावर त्याला परवानगीही मिळाली होती. यादरम्यान गिल म्हणाला होता की, “नवीन चेंडूने खेळणे नेहमीच चांगले असते. माझ्याकडे नवीन चेंडूचा अनुभव आहे आणि जेव्हा तुम्ही तिसऱ्या स्थानी फलंदाजी करता, तेव्हा हे फार वेगळे नसते. मात्र, यामध्ये थोडे अंतर असते.”

यापूर्वी गिल कधी उतरलेला तिसऱ्या स्थानी?
विशेष म्हणजे, गिल अखेरचा डिसेंबर 2021मध्ये कसोटीत तिसऱ्या स्थानावर खेळला होता. मुंबईत खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या त्या कसोटी सामन्यात गिल दुसऱ्या डावात 75 चेंडू खेळून फक्त 47 धावाच करू शकला होता. (ind vs wi 1st test cricketer shubman gill flop show at number three batting position departs cheaply read here)

महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: पहिल्या कसोटी शतकानंतर भावूक झाला जयसवाल; म्हणाला, ‘मला स्वत:चा अभिमान…’
दुसऱ्या दिवशीही भारताचा दबदबा! यशस्वी-रोहितच्या शानदार शतकानंतर 2 मोठे धक्के, संघाकडे 162 धावांची आघाडी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---