पहिले दोन्हीही वनडे सामने जिंकत मालिका आपल्या नावावर केलेला भारतीय संघ बुधवारी (२७ जुलै) वेस्ट इंडिजविरुद्ध होणारा तिसरा व शेवटचा वनडे सामनाही जिंकण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल. यजमानांना वनडे मालिकेत क्लिन स्वीप देण्यासाठी भारतीय संघ सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसेल. दुसरीकडे वेस्ट इंडिजचे लक्ष्य आपली पराभवाची मालिका तोडण्याकडे असेल. कारण यापूर्वी त्यांना बांगलादेशकडून ०-३ ने पराभवाचा सामना करावा लागला होता.
मालिका विजयानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड भारतीय संघात काही नव्या खेळाडूंना आजमावू शकतात. त्यामुळे भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळू शकतात.
शुबमन गिलच्या जागी खेळू शकतो ऋतुराज
फलंदाजी विभागात सलामीवीर शुबमन गिलच्या जागी ऋतुराज गायवाडला उतरवण्याचा विचार भारताचे संघ व्यवस्थापन करू शकते. गिलने मागील दोन्हीही वनडे सामन्यात दमदार प्रदर्शन केले होते. त्याने पहिल्या सामन्यात ६४ व दुसऱ्या सामन्यात ४३ धावांची उपयुक्त खेळी केली होती. परंतु तिसऱ्या सामन्यात त्याला विश्रांती देत गायकवाड वनडेत कसे प्रदर्शन करतो, हे पाहण्यासाठी संघ व्यवस्थापन हा निर्णय घेऊ शकते.
अर्शदीप सिंगलाही मिळू शकते संधी
कर्णधार शिखर धवनने जर या सामन्यात २ उजव्या हाताच्या फिरकीपटूंसोबत उतरण्याची योजना बनवली तर युझवेंद्र चहलला बाहेर बसावे लागू शकते. परंतु यामुळे गोलंदाजी विभागात विविधतेचा अभाव जाणवू शकतो. यापूर्वीच्या दुसऱ्या वनडे सामन्यात अर्शदीप सिंगला दुखापत झाल्याने त्याच्या जागी उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आवेश खानला उतरवले होते. परंतु त्याने ६ षटकात ५४ धावा खर्च केल्या होत्या आणि एकही विकेट घेऊ शकला नव्हता. तसेच आवेश आणि प्रसिद्ध कृष्णाची गोलंदाजी शैली सारखीच आहे. त्यामुळे दोघांपैकी एकालाच प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवले जाऊ शकते आणि अर्शदीपला संधी दिली जाऊ शकते.
दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन
भारत: शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), दीपक हुड्डा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, आवेश खान.
वेस्ट इंडिज: शाई होप (यष्टीरक्षक), ब्रेंडन किंग, शामराह ब्रूक्स, कायले मेयर्स, निकोलस पूरन (कर्णधार), रोव्हमन पॉवेल, अकील होसेन, रोमॅरियो शेफर्ड, अल्झारी जोसेफ, हेडन वॉल्श जूनियर, जेडेन सील्स.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पंतने इंस्टाग्राम लाईव्हमध्ये खास व्यक्तिला केले सहभागी, धोनीची एक झलक दिसल्यामुळे व्हिडिओ व्हायरल
भारताच्या विंडिजला व्हाईटवॉश देण्याच्या इराद्यावर पाऊस फेरणार पाणी? खेळपट्टीबद्दलही घ्या जाणून
डेविड वॉर्नरवर पुन्हा चढला अल्लू अर्जुनचा फिव्हर, ऍक्शन सीनमध्ये दिसतोय डॅशिंग