---Advertisement---

इंग्लंडला चारली धूळ आता वेस्ट इंडीजचे बारी, जाणून घ्या आमने-सामने कामगिरी

On: बुधवार, जुलै 20, 2022 5:55 PM
team India
---Advertisement---

भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध भारताला तीन सामन्यांची एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. दौऱ्याची सुरुवात उभय संघातील एकदिवसीय मालिकेने होणार आहे, तर टी-२० मालिकेनंतर दौऱ्याचा शेवट होईल. शिखर धवनच्या नेतृत्वातील भारतीय संघ एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी त्रिनिदादमध्ये दाखल झाला आहे. चला तर जाणून घेऊया भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात यापूर्वी खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांमधील आकडेवारी. 

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडीज –
भारत आणि वेस्ट इंडीज संघांमध्ये आतापर्यंत एकूण १३६ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये भारतीय संघाचे पारडे वेस्ट इंडीजपेक्षा काहीसे झुकलेलेच दिसत आहे. भारताने वेस्ट इंडीजविरुद्ध एकूण ६७ सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे वेस्ट इेंडीजने भारताविरुद्ध एकूण ६३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. उभय संघात चार सामने असे खेळले गेले, जे निकाली निघाले नाहीत. तसेच दोन सामने बरोबरीने सुटले आहेत.

भारताने मायदेशात वेस्ट इंडीजविरुद्धचे एकूण ३२, तर वेस्ट इंडीजविरुद्ध एकूण १६ एकदिवसीय सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडीजने भारताविरुद्ध मायदेशात खेळताना एकूण २०, तर भारतात २८ एकदिवसीय सामने जिंकले आहेत.  उभय संघामध्ये असेही काही सामने खेळले गेले, जे भारत आणि वेस्ट इंडीज सोडून इतर ठिकाणी पार पडले. यापैकी १९ सामन्यांमध्ये भारताने, तर १५ सामन्यांमध्ये वेस्ट इंडीजने विजय मिळवला.

वेस्ट इंडीज विरुद्ध भारत एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक – 
पहिला सामना – २२ जुलै, २०२२ (शुक्रवार) – त्रिनिदाद
दुसरा सामना २४ जुलै, २०२२ (रविवार) – त्रिनिदाद
तिसरा सामना – २७ जुलै, २०२२ (बुधवार) – त्रिनिदाद

वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ –
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.

वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदिप यादव, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

जिम्बाब्वे दौऱ्या भारताचे दिग्गज करणार पुनरागमन, पाहा कसा असेल संभांव्य संघ

महत्वाच्या बातम्या – 

विराट कोहलीवर नामुष्कीची वेळ, फॉर्ममध्ये परतण्यासाठी निवडकर्त्यांचा अजब प्लॅन

स्टोक्सच्या खांदयावर बंदुक ठेवत पीटरसनने साधला निशाणा! म्हणाला, ‘मला तर बॅन केले…’

‘जलवा है हमारा!’ इंग्लंडविरुद्ध शतक झळकावणारा पंत आता ट्विटरवरही करतोय हवा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---