बहुप्रतिक्षित वेस्ट इंडिज विरुद्ध भारत पहिला कसोटी सामना बुधवारपासून (दि. 12 जुलै) सुरू होत आहे. हा सामना डॉमिनिका येथे खेळला जाणार आहे. या सततच्या पराभवामुळे टीकेचा धनी ठरलेल्या रोहित शर्मा याच्यासाठी ही मालिका खूपच महत्त्वाची असेल. तसेच, वेस्ट इंडिज संघ विश्वचषक 2023 स्पर्धेच्या क्वालिफायर फेरीतून बाहेर पडल्यानंतर पुनरागमनाचा प्रयत्न करेल. चला तर, उभय संघातील पहिल्या कसोटी सामन्याविषयी सर्वकाही जाणून घेऊयात…
आमने-सामने आकडेवारी
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (West Indies vs India) संघ आतापर्यंत 98 कसोटी सामन्यात आमने-सामने आले आहेत. यातील 30 कसोटी सामने वेस्ट इंडिज (West Indies) संघाने जिंकले आहेत. तसेच, 22 सामन्यात भारताला विजय मिळवण्यात यश आले आहे. याव्यतिरिक्त 46 सामने अनिर्णित राहिले आहेत.
सामन्यायविषयी सर्वकाही
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील पहिला कसोटी सामना केव्हा खेळला जाईल?
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील पहिला कसोटी सामना 12 ते 16 जुलैदरम्यान खेळला जाईल.
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील पहिला कसोटी सामना कुठे खेळला जाईल?
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील पहिला कसोटी सामना विंडसर पार्क, डॉमिनिका येथे खेळला जाईल.
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील पहिला कसोटी सामना केव्हा सुरू होईल?
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील पहिला कसोटी सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 7.30 वाजता सुरू होईल.
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील पहिला कसोटी सामना टीव्हीवर कसा पाहायचा?
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील पहिल्या कसोटी सामन्याचे प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्सवर केले जाईल.
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील पहिल्या कसोटी सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे होईल?
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील पहिल्या कसोटी सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा आणि फॅनकोड ऍपवर होईल.
उभय संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन
भारत-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ईशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, मुकेश कुमार/नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज
वेस्टइंडीज
क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), तेजनारायण चंद्रपॉल, किर्क मॅकेन्झी, ऍलिक अथानाझे, जर्मेन ब्लॅकवूड, रहकीम कॉर्नवॉल, जेसन होल्डर, जोशुआ दा सिल्वा (यष्टीरक्षक), शॅनन गॅब्रिएल, अल्झारी जोसेफ, केमार रोच. (ind vs wi live streaming head to head records and where to watch in india know here)
महत्वाच्या बातम्या-
आख्खं जग म्हणतंय ‘भारत विश्वचषकाचा प्रबळ दावेदार’, पण वर्ल्ड चॅम्पियन युवराजला नाही गॅरेंटी; म्हणाला…
हसरंगा बनला जून 2023चा प्लेअर ऑफ द मंथ, गार्डनरने रचला इतिहास