भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi odi series) यांच्यातील एकदिवसीय मालिका शुक्रवारी संपली. मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने (team india) ९६ धावांनी मोठा विजय मिळवला आणि वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप दिला. तिसऱ्या सामन्यापूर्वी खेळल्या गेलेल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला होता. भारताचा युवा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत कृष्णाने एकूण ९ विकेट्स घेतल्या. प्रसिद्ध कृष्णाला मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. भारतीय संघाला मालिका जिंकवण्यासाठी कृष्णाचे योगदान महत्वाचे ठरले आहे. त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील हा सातवा सामना होता आणि यामध्ये तो भारतासाठी सर्वोत्तम प्रदर्शन करणारा गोलंदाज ठरला आहे.
भारतीय संघासाठी पदार्पण केल्यानंतर पहिल्या सात सामन्यात सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंमध्ये प्रसिद्ध कृष्णा पहिल्या क्रमांकावर आला आहे. कारकिर्दीतील पहिल्या सात एकदिवसीय सामन्यात त्याने सर्वाधिक १८ विकेट्स नावावर केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अजीत आगरकर आणि जसप्रीत बुमराह आहेत. ज्यांना स्वतःच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिल्या सात सामन्यांमध्ये प्रत्येकी १६ विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर माजी गोलंदाज प्रवीण कुमार यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने सुरुवातीच्या सात एकदिवसीय सामन्यांमध्ये १५ विकेट्स घेतल्या होत्या. यापाठोपाठ चौथ्या क्रमांकावर नरेंद्र हिरवाणी, जहीर खान आणि रविचंद्रन अश्विन यांची नावे आहेत. ज्यांनी प्रत्येकी १४ विकेट्स घेतल्या होत्या.
दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा विचार केला, तर मालिकेतील तिन्ही सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळले गेले. ६ फेब्रुवारीला खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने ६ विकेट्स राखूव विजय मिळवला होता, त्यानंतर ९ फेब्रुवारीला खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारत ४४ धावांनी विजयी ठरला होता. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटाच सामना भारताने ९६ धावांनी जिंकला आहे. उभय संघातील टी-२० मालिका १६ फेब्रुवारीला कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये सुरू होईल. टी२० मालिकेतील सामने १६, १८ आणि २० फेब्रुवारीला खेळले जातील.
महत्वाच्या बातम्या –
कायरन पोलार्ड हरवला! ब्रावोने केले शोधून देण्याचे आवाहन
‘त्याला फक्त थोड्या नशिबाची गरज आहे’; दिग्गजाने केली विराटची पाठराखण
एचपी रॉयल्स, आझम स्पोर्ट्स अकादमी यांची विजयी सलामी