---Advertisement---

टी२० मोड ऑन! ‘रोहितसेना’ लागली सरावाला, वनडेनंतर टी२०तही विंडीजला देणार पराभवाचा धक्का?

On: मंगळवार, फेब्रुवारी 15, 2022 9:49 PM
Indian Players Practising
---Advertisement---

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये (ind vs wi) तीन सामन्यांची टी२० मालिका बुधवार(१६ फेब्रुवारी) पासून खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी दोन्ही संघ तयारीला लागले आहेत. भारताच्या प्रशिक्षकांद्वारा आयोजित केलेल्या प्रशिक्षण सत्रात कर्णधार रोहित शर्मासोबत (rohit sharma) विराट कोहली (virat kohli) आणि बाकी संघाने मैदानात खूप मेहनत घेतली आहे. बीसीसीआयने मंगळवारी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये सर्व खेळाडू सराव करताना दिसत आहेत. वेस्ट इंडिजला एकदिवसीय मालिकेत ३-० ने पराभूत करुन भारतीय संघ टी२० मालिकेच्या तयारीला लागला आहे.

संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा चांगली कामगिरी करत संघाचे नेतृत्व करत आहे. पत्रकार परिषदेदरम्यान रोहित शर्मा संघाबद्दल बोलला. तसेच संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीबद्दलही त्याने माध्यमांना सल्ला दिला आहे. संघात जगातील काही आघाडीचे खेळाडू असूनही भारतीय फलंदाजी मुख्यत: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कामगिरीवर अवलंबून आहे. कोहली वाईट अवस्थेतून जात असल्याने रोहित शर्मा त्याच्या बाजूने बोलत सोशल माध्यमांना कोहलीला एकटे सोडण्याचे आवाहन केले आहे. तसेच विराट कोहलीने मंगळवारी स्वतः प्रशिक्षण सत्रातील काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

रोहित माध्यमांना म्हणाला की, “तुम्ही लोक विराटला काही काळ एकटे सोडा, तो बरा होईल. विराट एक दशकाहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. तो इतके दिवस क्रिकेट खेळत असल्याने त्याला दबाव झेलायला येते. बाकी सर्व काही माध्यमांवर अवलंबून आहे. त्याला थोडा वेळ द्या, तो बरा होईल.”

भारत आणि वेस्ट इंडीज संघांमध्ये तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. १६ फेब्रुवारीला पहिला सामना खेळला जाणार आहे तर १८ फेब्रुवारीला दुसरा आणि २० फेब्रुवारीला तिसरा सामना खेळला जाणार आहे. या दोन संघांतील एकदिवसीय मालिका भारतीय संघाने जिंकली आहे.

भारताचा टी२० संघ
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्य कुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुड्डा.

महत्त्वाच्या बातम्या-

महिला वनडे क्रमवारीत कर्णधार मिताली दुसऱ्या स्थानावर कायम, मात्र स्म्रीतीला मोठे नुकसान

युझीने नव्या आयपीएल फ्रँचायझीलाही नाही सोडले, राजस्थान रॉयल्सशी घेतली फिरकी; पाहून व्हाल लोटपोट

पिंक पँथर्सचा यू मुंबावर ‘मोठा’ विजय, गुणतालिकेत सहाव्या स्थानी घेतली उडी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---