दक्षिण अफ्रिकेकडून मिळालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारताला फेब्रुवारी महिन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध टी-२० आणि एकदिवसीय मालिका (ind vs wi t20 & odi series) खेळायची आहे. बुधवारी (२६ जानेवारी) बीसीसीआयने आगामी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. वेस्ट इंडीजविरुद्धच्या या मालिकेसाठी काही युवा खेळाडूंना संधी दिली गेली आहे, तर काहींनी मोठ्या काळानंतर संघात पुनरागमन केले. पण एका खेळाडू असा आहे, ज्याला संधी मिळणे अपेक्षित होते, पण निवडकर्त्यांनी पुन्हा एकदा त्याची निराशा केली आहे.
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) याला वेस्ट इंडीजविरुद्ध आगामी टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत संधी मिळणे अपेक्षित होते आणि यासाठी त्याची दावेदारीही भक्कम होती. परंतु दुर्दैवाने त्याला पुन्हा एकदा संघाच्या बाहेर ठेवले गेले आहे. त्याच्यासारख्या गुणवंत खेळाडूकडे निवडकर्त्यांनी पुन्हा एकदा दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळाले आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध टी-२० आणि एकदिवसीयपैकी एकाही मालिकेसाठी त्याची निवड केली गेली नाहीय.
व्हिडिओ पाहा- आणि विराट कोहलीला धरावे लागले सचिनचे पाय
दरम्यान, सॅमसनकडे भारतीय संघात स्वतःचे नियमित स्थान बनवण्याची क्षमता आहे, पण निवडर्त्यांकडून त्याला नेहमीच सावत्रपणाची वागणूक मिळाली आहे. त्याने यापूर्वी भारतासाठी शेवटचा सामना जुलै २०२१ मध्ये खेळला होता. मागच्या वर्षी पार पडलेल्या भारताच्या या श्रीलंका दौऱ्यात सॅमसनला संधी मिळाली होती, पण त्यानंतर त्याला एकदाही भारतीय संघाच्या जर्सीमध्ये पाहिले गेले नाही. त्याला अशाप्रकारे सतत संघातून बाहेर ठेवून कधीतरी एक दोन सामन्यांमध्ये संधी दिली जाते.
अशात राष्ट्रीय संघात खेळताना त्याच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा ठेवणे, ही गोष्ट कितपत योग्य आहे, असाही प्रश्न उद्भवतो. सॅमसनला जर संघात नियमित स्थान मिळाले, तर तो चांगले प्रदर्शन करेल यात कसलीही शंका नाही.
वेस्ट इंडीजविरुद्ध मायदेशात खेळल्या जाणाऱ्या या टी-२० आणि एकदिवसीय मालिकाचा विचार केला, तर त्याची सुरुवात ६ फेब्रुवारीपासून होईल. उभय संघातील एकदिवसीय मालिका ६, ९ आणि ११ फेब्रुवारीला खेळली जाईल. तसेच टी-२० मालिका १६, १८ आणि २० फेब्रुवारीला खेळली जाईल.
महत्वाच्या बातम्या –
खरेदीदार आहे का? ‘हा’ प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू बिटकॉइनसाठी विकतोय ट्विटर अकाऊंट, वाचा सविस्तर
व्हिडिओ पाहा –