भारत आणि वेस्ट इंडिज (ind vs west indies) यांच्यात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेला ६ फेब्रुवारीपासुन सुरुवात होत आहे. एकदिवसीय आणि टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या संघात भारताचा स्टार खेळाडू अष्टपैलू वाॅशिंग्टन सुंदर (washington sundar) याची सुद्धा निवड करण्यात आली आहे. त्यामुळे दुखापतीनंतर तो लवकरच खेळताना दिसणार आहे. वेस्ट इंडिज मालिकेच्या अगोदरच त्याने आपला लुक बदलला आहे. त्याने सोशल मिडीयावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो चांगलाच खुश दिसत आहे.
वाॅशिंग्टन सुंदरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने संपूर्ण केस कापून टक्कल केला आहे. चाहत्यांंना त्याचा हा नवा लुक आणि त्याचा पोशाख खुप आवडला आहे. त्या फोटोत त्याने पांढरा शर्ट आणि लुंगी परिधान केली आहे. त्याचा नवा लूक अगदी अभिनेता रजनीकांतच्या शिवाजी द बॉस चित्रपटासारखा दिसतो आहे. त्याने आपला फोटो शेअर करत, शिवाजी चित्रपटातील ‘क्यो हिला डाला ना’ असा डायलॉग कॅप्शनमध्ये लिहिला आहे.
त्याच्या या फोटोला एक लाखांहून अधिक लाइक्स आहेत. चाहत्यांनी त्याच्या फोटोवर प्रतिक्रीयाही दिल्या आहेत. त्याचा हा फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/CZT08T5vEjY/?utm_source=ig_web_copy_link
मागच्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चमकदार कामगिरी केल्यानंतर सुंदरला दुखापत झाली, त्यामुळे तो बराच काळ संघाबाहेर होता. या दुखापतीमुळे तो टी २० विश्वचषकही खेळू शकला नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी सुंदरची संघात निवड झाली होती, पण कोरोना पाॅझिटीव्ह आल्यामुळे तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकला नाही. आता तो तंदुरुस्त असल्यामुळे वेस्ट इंडिज मालिकेत पुनरागमन करताना दिसणार आहे.
भारतीय संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध ३ एकदिवसीय आणि ३ टी २० मालिका खेळायच्या आहेत. या दोन्ही संघात वाॅशिंग्टन सुंदरची निवड करण्यात आली आहे. एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना ६ फेब्रुवारी, दुसरा सामना ९ फेब्रुवारी तर तिसरा सामना ११ फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिसमवर खेळवले जाणार आहेत. नंतर पहिला टी २० सामना १६ फेब्रुवारी, दुसरा १८ फेब्रुवारी आणि तिसरा २० फेब्रुवारीला कोलकत्ताच्या ईडन गार्डनमध्ये खेळवले जाणार आहेत.
व्हिडिओ पाहा- काय घडलं होतं भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल(उपकर्णधार),ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, श्रेयस अय्यर, विराट कोहली, दीपक हुड्डा, सुर्यकुमार यादव, वाॅशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, दीपक चहर, रिषभ पंत, शार्दुल ठाकुर, युझवेंद्र चहल,रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान
टी २० मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल(उपकर्णधार),इशान किशन,व्यंकटेश अय्यर,अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, वाॅशिंग्टन सुंदर, दीपक चहर, रिषभ पंत, शार्दुल ठाकुर, युझवेंद्र चहल,रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, आवेश खान, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार
महत्त्वाच्या बातम्या-
अंडर-१९ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचे लाईन अप निश्चित, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘या’ दिवशी भिडणार भारत
एक बॉल, एक विकेट आणि १२ धावा, ऑस्ट्रेलियाविरुद्धची ऐतिहासिक ऍशेस अनिर्णीत राखण्यात इंग्लंडला यश
सूर्यकुमारच्या ताफ्यात ‘विंटेज जोंगा जीप;’ भारतीय सैन्याशीही राहिले नाते
हेही पाहा-