भारतीय महिला संघ (Indian Women’s Team) सध्या न्यूझीलंडमध्ये महिला विश्वचषक खेळत आहे. पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तावर मात केली. त्यानंतर आता भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषकातील दुसरा सामना खेळला. हा सामना हॅमिल्टनमध्ये खेळला गेला. भारतीय संघाची वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकर हिने या सामन्यात अप्रतिम प्रदर्शन केले. न्यूझीलंडची सलामीवीर सुझी बेट्सला पूजामुळे स्वस्तात विकेट गमवावी लागली.
भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने सामन्याच्या सुरुवातील नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिवाइन आणि सुझी बेट्स (Suzie Bates) यांनी न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात केली. सामन्याच्या तिसऱ्या षटकात सुझी बेट्सने स्वतःची विकेट स्वस्तात गमावली. या षटकात अनुभवी झूलन गोस्वामी गोलंदाजी करत होती आणि पूजा वस्त्राकर (Pooja Vastrakar) हिने मारलेल्या डायरेक्ट थ्रोमुळे सुझी धावबाद झाली. वस्त्राकरने फेकलेल्या चेंडूपुढे सुझीची गती कमी पडली.
https://www.instagram.com/reel/Ca5730mhldG/?utm_source=ig_web_copy_link
सुझी बेट्सने सामन्यात १० चेंडू खेळले आणि यामध्ये अवघ्या ५ धावा करू शकली. झूलन गोस्वामीच्या चेंडूवर सोफी डिवाइनला आशा होती की, एक धाव सहज मिळेल. डिवाइनच्या इच्छेमुळे सुझीही एक धाव घेण्यासाठी धावली, पण वस्त्राकरने चपळाई दाखवत केलेल्या डायरेक्ट थ्रोमुळे भारतीय संघाला महत्वाची विकेट मिळाली. सोफी डिवाइनने पुढे ३० चेंडू खेळून काढले आणि यामध्ये ३५ धावा केल्या. डिवाइनची विकेटही वस्त्राकरनेच घेतली.
दरम्यान, पुजा वस्त्राकरच्या डायरेक्ट थ्रोमुळे संघाला पहिले यश तर मिळालेच, पण गोलंदाजीमध्ये तिने जबरदस्त प्रदर्शन केले. तिने टाकलेल्या १० षटकांमध्ये ३४ धावा खर्च केल्या आणि यामध्ये ४ महत्वाच्या विकेट्स घेतल्या. यादरम्यान, वस्त्राकरने ४७ व्या षटकात लागोपाठ चेंडूवर दोन विकेट्स घेतल्या. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने ९ विकेट्सच्या नुकसानावर २६० धावा केल्या. यामध्ये त्यांच्या एलिया केरीच्या ५० आणि एमी सॅटर्थवाइट हिने ७५ धावांची सर्वात मोठी खेळी केली.
महत्वाच्या बातम्या –
पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा: माव्हरिक्सची जॅग्वार्सवर मात, सेलर्सचाही रोमहर्षक विजय
कपिल पाजींचा सन्मान! ‘या’ स्टेडियमला दिले जाणार नाव; युवीच्या नावे होणार पव्हेलियन
PHOTOS: राजस्थान रॉयल्सने नव्या रंगात नव्या ढंगात केली सरावाला सुरूवात