---Advertisement---

‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात भारतीय संघ उतरणार नव्या जोशात, होऊ शकतात ‘हे’ ५ बदल

On: रविवार, डिसेंबर 20, 2020 12:13 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये ऍडलेड येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून पराभव केला. भारतीय संघाच्या झालेल्या या पराभवाबद्दल सर्वच क्रिकेट रसिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. विजयाच्या टप्प्यावर असलेल्या भारतीय संघाचा झालेला पराभव खेळाडूंना विसरणे देखील अवघड जाणार आहे. मात्र, ही सर्व निराशा दूर करून २६ तारखेपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ अधिक जोशाने खेळेल अशी सर्वांना आशा आहे. दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात हे ५ महत्त्वाचे बदल होवू शकतात.

१. विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भूषविणार कर्णधारपद
पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन भारतात परतणार आहे. अशा परिस्थितीत भारताचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणे दुसऱ्या कसोटी सामन्यापासून भारतीय संघाचे नेतृत्त्व करणार आहे. परिस्थिती जरी बिकट असली, तरी रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघ नवीन जोशात मैदानात उतरेल अशी सर्व क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. विराटच्या अनुपस्थितीत केएल राहुलला संधी दिली जाणार अशी शक्यता दिसत आहे.

२. पृथ्वी शॉ ऐवजी शुबमन गिलला मिळू शकते संधी
पहिल्या सामन्यात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉ ऐवजी शुबमन गिलला सलामीला संधी मिळू शकते. संघ व्यवस्थापनाने पहिल्या सामन्यात शॉ याच्यावर सलामीची जबाबदारी सोपवली होती. मात्र, यात तो अपयशी ठरल्याने गिल सलामीची जबाबदारी पार पाडू शकतो.

३. विहारी ऐवजी जडेजाला मिळू शकते संधी
पहिल्या सामन्यातील दोन्ही डावात हनुमा विहारी अपयशी ठरल्याने त्याच्या ऐवजी रवींद्र जडेजाला संधी मिळू शकते. जडेजा पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्यामुळे हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल की जडेजा वेळेत आपल्या दुखापतीतून बाहेर येऊ शकतो की नाही.

४. शमीच्या दुखपतीमुळे सिराजला मिळू शकते संधी
दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या हाताला चेंडू लागला असून त्याला गंभीर दुखापत झाली आहे. शमीने चेंडू हाताला लागल्यानंतर उर्वरित सामन्यात सहभाग घेतला नाही. काही वेळानंतर बातमी समोर आली की शमीच्या हाताला फ्रॅक्चर झाले असून तो उर्वरित मालिकेतून बाहेर झाला आहे. अशा परिस्थितीत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला पदार्पणाची संधी मिळू शकते.

५. रिषभ पंतला मिळू शकते संधी

मालिकेतील पहिल्या सामन्यात रिषभ पंत ऐवजी वृद्धीमान साहाला संधी मिळाल्याने अनेक क्रिकेट पंडितांनी नाराजी व्यक्त केली होती. सामन्यातील दोन्ही डावात साहा पूर्णतः अपयशी ठरल्याने त्याच्या जागी रिषभ पंतला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

ट्रेंडिंग लेख-

‘या’ तीन दिग्गज खेळाडूंची मुले, भविष्यात करू शकतात भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व

भारतीय संघाचे ६ धडाकेबाज खेळाडू, ज्यांनी २०२० मध्ये केले क्रिकेटला ‘बाय बाय’

महत्त्वाच्या बातम्या-

पाकिस्तानचे भविष्य ‘या’ माजी खेळाडूच्या हाती; सांभाळणार मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी

फ्लॉप शोनंतरही ‘हा’ माजी ऑस्ट्रेलियन फलंदाज देतोय पृथ्वी शॉला पाठिंबा, काय आहे यामागचं कारण

दुसऱ्या कसोटीत भारतासाठी ‘हा’ खेळाडू ठरू शकतो मोठा ‘गेमचेंजर’, ऑसीच्या दिग्गज खेळाडूचे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---