एमर्जिंक एशिया चषक 2023चा पहिला सामना भारत अ संघाने 8 विकेट्स राखून जिंकला. यूएई अ संघाविरुद्धच्या सामन्यात भारताचा कर्णधार यश धुल याने अप्रतिम खेळी करत शतक ठोकले. भारताला जिंकवण्यासाठी यशने निकिन जोस याच्यासोबत महत्वपूर्ण भागीदारी केली. सोबतच हर्षित राणा याने गोलंदाजी विभागात महत्वपूर्ण योगदान दिले, ज्यामुळे संघ मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवू शकला.
उभय संघांतील या सामन्यात भारत अ (India A) संघाने नाणेफेक जिंकली आणि यूएई अ (United Arab Emirates A) संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजीला आलेला यूएई अ संघ 50 षटकांमध्ये 9 बाद 175 धावांपर्यंतच मजल मारू शकला. प्रत्युत्तरात यश धुल (Yash Dhul) याच्या नेतृत्वातील भारताने अवघ्या 26.3 षटकात आणि दोन विकेट्सच्या नुकसानावर विजय मिळवला. यश धुल याने 84 चेंडूत 108* धावांची वादळी खेळी केली. यात 20 चौकार आणि एक षटकार होता. त्याच्या साथ मिळाली ती निकिन जोस (Nikin Jose) याची चांगली साथ मिळाली. निकिनने 53 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 41 धावा केल्या. सलामीवीर साई सुदर्शन आणि अभिषेक शर्मा यांनी मात्र अनुक्रमे 8 आणि 19 धावांची खेळी करून विकेट्स गमावल्या.
त्याआधी भारताच्या गोलंदाजांनीही अप्रतिम प्रदर्शन केले आणि विरोधी संघाला निर्धारित धावसंख्येवर रोखले. हर्षित राणा (Harshit Rana) याने 9 षटकात 41 धावा खर्च करून 4 विकेट्स घेतल्या. नितीश कुमार रेड्डी आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तसेच अभिषेक शर्मा यालाही एक विकेट मिळाली.
यूएई संघासाठी अशवंथ वलथापा (Ashwanth Valthapa) याने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. मोहम्मद फराझुद्दीन याने 88 चेंडूत 35 धावांची खेळी केली होती. सलामीवीर आर्यांश शर्मा यानेही 38 धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. यूएईच्या गोलंदाजी विभागाचे प्रदर्शन पाहिले तर फक्त दोघांनाच विकेट्स मिळाल्या. मुहम्मद जवादुल्लाह आणि अली नासिर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (India A beat UAE A by 8 wickets in the first match of Emerging Asia Cup 2023 Hundred by Captain Yash Dhull)
महत्वाच्या बातम्या –
‘रोहित शर्मा फरारी आहे, पण तो…’, माजी दिग्गजाचे विधान वेधतंय क्रिकेटप्रेमींचं लक्ष
क्रिकेट विश्वचषकातील सर्वात नाट्पूर्ण सामना; इंग्लंड ठरला होता विश्वविजेता, तर पराभूत न होताही न्यूझीलंड मात्र उपविजेता