चेन्नईत खेळल्या जाणाऱ्या आगामी 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारत अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाला न्यूझीलंड अ संघाविरुद्ध 22 सप्टेंबरपासून 3 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. 27 सप्टेंबर रोजी या मालिकेतील शेवटचा सामना खेळला जाईल. महत्त्वाचे म्हणजे, यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याला भारत अ संघाचा कर्णधार बनवले गेले आहे.
27 वर्षीय सॅमसनला टी20 विश्वचषक 2022 साठी संघात जागा देण्यात आली नाही. तसेच टी20 विश्वचषकापूर्वी मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेसाठीही त्याला दुर्लक्षित करण्यात आले आहे. मात्र न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या मायदेशातील एकदिवसीय मालिकेसाठी त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सॅमसनबरोबरच भारतीय संघातून बऱ्याच काळापासून बाहेर असलेल्या सलामीवीर पृथ्वी शॉ यालाही या संघात सहभागी केले आहे. तसेच ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार हेदेखील या संघाचा भाग आहेत. यष्टीरक्षक केएस भरत यालाही संघात सहभागी करण्यात आले आहे.
गोलंदाजी विभागात कुलदीप यादव, शाहबाज अहमद, राहुल चाहर, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक अशी नावे आहेत. तसेच मुंबई इंडियन्सचा धाकड क्रिकेटपटू तिलक वर्मा आणि राज बावा हेदेखील भारत अ संघाता जागा बनवण्यात यशस्वी ठरले आहेत.
NEWS – India "A" squad for one-day series against New Zealand "A" announced.
Sanju Samson to lead the team for the same.
More details here 👇👇https://t.co/x2q04UrFlY
— BCCI (@BCCI) September 16, 2022
भारत अ संघ :
पृथ्वी शॉ, अभिमन्यू ईश्वरन, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, संजू सॅमसन (कर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, शाहबाज अहमद, राहुल चाहर, तिलक वर्मा, कुलदीप सेन, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, नवदीप सैनी, राज अंगद बावा
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मार्क बाउचर बनले मुंबई इंडियन्सचे सातवे महागुरू, यापूर्वी ‘या’ 6 दिग्गजांनी दिलेय प्रशिक्षण
ब्रेकिंग! मुंबई इंडियन्सला मिळाले नवे प्रशिक्षक, जयवर्धनेंच्या जागी ‘या’ दिग्गजाची वर्णी
रॉयल लाईफ जगतो टेनिसचा सम्राट, फेडररपुढे धोनी-कोहलीची कमाई चिल्लर; आकडा तर ऐका