भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला 17 डिसेंबर पासून सुरुवात होईल. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात तीन दिवसाच्या सराव सामन्याला रविवारी (6 डिसेंबर) सुरुवात झाली. या सराव सामन्याच्या पहिल्याच दिवशी अजिंक्य रहाणेने शतकी खेळी केली आहे.
भारताची सुरुवात खराब
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताचा हा निर्णय योग्य ठरला नाही. अवघ्या 6 धावांवर या संघाला 2 धक्के बसले. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल यांना भोपळाही फोडता आला नाही.
अनुभवी फलंदाज हनुमा विहारीही लवकरच परतला माघारी
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या हनुमा विहारीने संयमी सुरुवात केली. मात्र त्यालाही खेळपट्टीवर टिकता आले नाही तो अवघ्या 15 धावांवर वेगवान गोलंदाज जॅकसन बर्डच्या चेंडूवर पायचीत झाला. भारताने अवघ्या 40 धावांत 3 गडी गमावले.
राहणे-पुजारा जोडीने सावरला डाव
मात्र, भारताचे अनुभवी फलंदाज आणि भारत अ संघाचा कर्णधार अजिंक्य राहणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी जबाबदारीने डाव पुढे नेला. या दोघांनी कोणतीही जोखीम न पत्करता फटके खेळले.
चेतेश्वर पुजारा 54 धावांवर झाला बाद
ही जोडी शतकीय भागीदारीकडे वाटचाल करणार, असे वाटत असतानाच संघाला आणखी एक धक्का बसला. चेतेश्वर पुजारा 54 धावांवर झेलबाद झाला. ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनने त्याला तंबूत पाठवले. राहणे आणि पुजारा यांच्यात चौथ्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी झाली.
राहणेचे शतक पूर्ण
मात्र, अजिंक्य राहणे खेळपट्टीवर तग धरून उभा होता. त्याने संयमीपणे फलंदाजी करत आपले शतक पूर्ण केले. तत्पूर्वी भारताने आर अश्विन(5) आणि वृद्धीमान साहा(0) या दोघांच्याही विकेट्स झटपट गमावल्या होत्या. पण असे असले तरी रहाणेने कुलदीप यादव आणि नंतर उमेश यादवला साथीला घेतले आणि शतकी खेळी पूर्ण केली. रहाणेने 203 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले आहे. तसेच कुलदीप 78 चेंडूत 15 धावा केल्या.
भारताने 86 षटकांत 7 बाद 235 धावा केल्या आहेत. यात राहणेचे 106 धावांचे योगदान असून तो अजूनही खेळत आहे. तसेच उमेश 24 धावांवर नाबाद आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हा’ क्रिकेटपटू मोहम्मद शमीवर टाकत आहे दबाव, दिग्गजाची प्रतिक्रिया
कर्णधार विराट कोहली ‘अशा’ टी20 मालिकेत कधीही झाला नाही पराभूत; ऑस्ट्रेलिया रोखणार का यशस्वी घोडदौड?
‘कन्कशन सब्स्टीट्युट’ म्हणून चहलला संधी दिल्याबद्दल अनिल कुंबळे म्हणाला…
ट्रेंडिंग लेख –
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग
‘बर्थडे बॉय’ रविंद्र जडेजाबद्दल या खास १० गोष्टी माहित आहेत का?
भारताच्या ‘या’ ५ दिग्गज क्रिकेटपटूंचा आज आहे वाढदिवस