रविवारी (28 ऑगस्ट) आशिया चषक 2022 मधील बहुप्रतिक्षित सामना पार पडला. दुबईच्या मैदानावर भारत विरुद्ध पाकिस्तान या क्रिकेटविश्वातील दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये रोमहर्षक लढत झाली. या सामन्यात भारताने त्यांची पाकिस्तानवरील विजयी परंपरा कायम राखत 5 विकेट्सने सामना जिंकला. टी20 विश्वचषकानंतर तब्बल दहा महिन्यांनी उभय संघात हा सामना खेळला गेला होता. मात्र, आता पुन्हा एकदा चाहत्यांना इतकी प्रतीक्षा कदाचित या हाय व्होल्टेज सामन्यासाठी करावी लागणार नाही.
यावर्षी आशिया चषकाचा फॉरमॅट काहीसा वेगळा ठरवण्यात आला आहे. यंदा दोन गटात प्रत्येकी तीन संघ सहभागी यातील प्रत्येकी दोन संघ सुपर फोर फेरीसाठी पात्र ठरतील. भारत व पाकिस्तान यांच्यासोबत अ गटात नवख्या हॉंगकॉंगचा समावेश आहे. तर दुसऱ्या गटात अफगाणिस्तान, श्रीलंका व बांगलादेश भिडतायेत.
अ गटातून भारत व पाकिस्तान सुपर फोरसाठी पात्र ठरण्याची सर्वाधिक शक्यता आहे. हॉंगकॉंगने एखादा अनपेक्षित निकाल न लावल्यास भारत व पाकिस्तान आरामात सुपर फोर फेरी खेळतील. सुपर फोरमध्ये दोन्ही गटातून पात्र झालेले दोन्ही संघ प्रत्येकाविरुद्ध एकएकदा खेळणार आहेत. त्याचा विचार केला तर, पुढील रविवारी म्हणजेच 6 सप्टेंबर रोजी भारत व पाकिस्तान एकमेकांशी दोन हात करताना दिसू शकतात.
सुपर फोरमध्येही गुणतालिकेत हेच दोन्ही संघ पहिल्या दोन स्थानावर राहिले तर प्रथमच आशिया चषकाचा अंतिम सामना भारत व पाकिस्तान यांच्यात होईल. आजवर झालेल्या कोणत्याही आशिया चषकाचा अंतिम सामना भारत व पाकिस्तान यांच्यात झाला नाही. भारताने आतापर्यंत सात वेळा तर पाकिस्तानने दोन वेळा आशिया चषकावर कब्जा केला आहे. 2018 मध्ये अखेरच्या वेळी झालेल्या या स्पर्धेत भारताने बांगलादेशला पराभूत करत विजेतेपद पटकावले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताविरुद्धचा पराभव माजी पाकिस्तानी दिग्गजाच्या जिव्हारी; म्हणाला, ‘आझमला कॅप्टन का बनवलंय’
तेरा भाई संभाल लेगा..! दबावाच्या क्षणीही दाखवला आत्मविश्वास, हार्दिकचा स्वॅग पाहून चाहते घायाळ