सध्या हांगझोऊमध्ये आशियाई गेम्स सुरू आहेत. आशियाई गेम्समध्ये महिला क्रिकेट स्पर्धेतील दोन्ही उपांत्यपूर्व सामन्यात पावसामने व्यत्यय आणला. गुरुवारी (21 सप्टेंबर) या स्पर्धेचे दोन्ही उपांत्यपूर्व सामने आयोजित केले गेले होते. पण पावसामुळे दोन्ही सामन्यांना निकाल हाती आला नाही. परिणामी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही महिला क्रिकेट संघ उपांत्य सामन्यात पोहोचले आहेत.
महिला क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी (21 सप्टेंबर) पहिला उपांत्यपूर्व सामना भारत आणि मलेशिया यांच्यात आयोजित केला गेला. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 15 षटकांमध्ये 2 बात 173 धावा केल्या. प्रत्युत्तरात मलेशियाने पहिल्या षटकातत दोन चेंडू खेळून एक धाव केली होती. मात्र तितक्यात पाऊस सुरू झाला आणि सामना इथेच थांबवावा लागला. मलेशियाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण भारतीय फलंदाजांनी विरोधी संघाचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला.
भारतासाठी शेफाली वर्मा (Shefali Verma) आणि स्मृती मंधाना (Smriti Mandhana) यांनी 5.2 षटकांमध्ये 57 धावा करून संघाला वेगवान सुरुवात मिळवून दिली. मंधानाने 16 चेंडूत पाच चौकार मारून 27 धावा केल्या आणि विकेट गमावली. त्यानंतर शेफाली आणि जेमिमाह रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) यांनी भारताचा डाव सांभाळला. संघाची धावसंख्या 5.4 षटकात 1 बाद 60 धावा असताना पावसाने मैदानात हजेरी लावल्यामुळे सामना काही वेळासाठी थांबवावा लागला. पण पावसानंतर दोन्ही फलंदाजांनी ताबडतोड खेळी करत संघासाठी 10 षटकात 100 धावांचा टप्पा पार केला.
शेफालीने 31 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तसेच जेमिमाह रॉड्रिग्जसोबत दुसऱ्या विकेटसाठी 47 चेंडूत 86 धावांची भागीदारी केली. शेफालीने या सामन्यात 67 धावांची सर्वोत्तम खेळी केली, तर जेमिमाहने 47 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. संघासाठी चौथ्या क्रमांकावर आलेल्या ऋचा घोष हिने अवघ्या 7 चेंडूत 21 धावांची खेळी केली.
दिवसातील दुसरा उपांत्यपूर्ण सामना पाकिस्तान आणि इंडोनेशिया यांच्यात होणार होता. या सामन्यात देखीव पाऊस विलेन ठरला. परिणामी सामना टॉस न होता आणि एकही चेंडू न खेळता रद्द करावा लागला. आकड्यांच्या आधारे भारत आणि पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहे. स्पर्धेचा तिसरा उपांत्यपूर्ण सामना श्रीलंका आणि थायलँड यांच्यात होणार आहे. चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात बांगलादेश आणि हाँगकाँग महिला संघ आमने सामने असतील. तिसरा आणि चौथा उपांत्य सामना शुक्रवारी (22 सप्टेंबर) खेळवला जाईल. (India and Pakistan reached the semi-finals of the women’s cricket tournament at the Asia Games 2023)
महत्वाच्या बातम्या –
लेक चालली सासरी! आफ्रिदी झाला भावूक, जावई अन् मुलीसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला…
दक्षिण आफ्रिकेला 880 व्होल्टचा झटका! World Cup 2023मधून ‘हे’ 2 घातक वेगवान गोलंदाज बाहेर, लगेच वाचा