इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. आतापर्यंत झालेल्या ४ कसोटी सामन्यात सध्या भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. आता या मालिकेतील अंतिम आणि महत्त्वाच्या ५ व्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघ शुक्रवारपासून (१० सप्टेंबर) मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात एकमेकांना भिडणार आहेत. या मालिकेत भारतीय संघाने आतापर्यंत दमदार प्रदर्शन केले असले तरी, मॅंचेस्टरमध्ये भारतीय संघाला आजपर्यंत एकदाही विजय मिळवता आला नाही.
भारतीय संघाला पुढचा कसोटी सामना १० ते १४ सप्टेंबरपासून मॅंचेस्टरमध्ये खेळायचा आहे. हा सामना भारतीय संघाने हरला तरीही भारतीय संघ मालिका गमावणार नाही. परंतु, भारतीय संघाने २००७ नंतर इंग्लंडमध्ये एकही मालिका जिंकली नाही. त्यामुळे भारतीय संघ हा सामना जिंकून किंवा अनिर्णित राखून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. मात्र भारतीय संघाने मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात गेल्या ८५ वर्षात अद्याप एकही सामना जिंकलेला नाही. त्यामुळे सध्या ही भारतीय संघासाठी चिंतेची बाब आहे.
मँचेस्टरमध्ये भारतीय संघाने आतापर्यंत ९ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ४ कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. तर ५ कसोटी सामने अनिर्णित राहिले होते. जर यंदाच्या मालिकेत भारतीय संघ मॅंचेस्टरमध्ये विजयी झाला. तर मॅंचेस्टरवरील आपला पहिला विजय साजरा करत भारतीय संघ इतिहास रचू शकतो.
भारताने या मैदानात १९३६ मध्ये पहिला सामना खेळला होता. हा सामना तेव्हा अनिर्णित राहिला होता. त्यावेळी इंग्लंडमध्ये सामना अनिर्णित करणे हे जिंकण्याएवढेच महत्त्वाचे मानले जायचे. तसेच १९४६ साली खेळण्यात आलेला सामना देखील अनिर्णित राहिला होता. त्यानंतर १९५२ झाली भारतीय संघाला मॅंचेस्टरमध्ये पहिल्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले होते.
तसेच भारतीय संघाने ११९० साली देखील सामना अनिर्णित ठेवला होता. ज्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधारपदात २०१४ मध्ये भारतीय संघाला पुन्हा एकदा एका डावाने हा सामना गमवावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघासाठी पुढचा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.
त्यामुळे विराट कोहली आणि भारतीय संघ मॅंचेस्टरमधील असलेला त्यांचा वाईट इतिहास बदलण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. सध्या भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये अत्यंत उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. याची प्रचिती गेल्या काही वर्षात दिसून आली आहे. भारतीय संघाने अनेक असे मैदान गाजवली. त्यामुळे सध्याच्या भारतीय संघाचा फॉर्म पाहता भारतीय संघ नक्कीच मॅंचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्डवर देखील आपला पहिला विजय प्राप्त करून इतिहास रचण्याची संधी आहे.
महत्वाच्या बातम्या –
–मी ‘वन डायमेंशनल खेळाडू’ नव्हे तर उत्कृष्ट अष्टपैलू; टी२० विश्वचषकासाठी कृणालने ठोकली दावेदारी
–“जर मला तेव्हा ड्रॉप केले नसते, तर राहुल द्रविडसह अन्य दिग्गज खेळाडू समोर आले नसते”
–ऍरॉन फिंचच्या घरी ‘नव्या पाहुणी’चे आगमन, ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने गोड फोटो केला शेअर; नावही सांगितले