चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एकोणिसाव्या एशियन गेम्स स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पहिल्या दिवशी आपली चमक दाखवली. पहिल्याच दिवशी तब्बल पाच पदके जिंकत भारतीय संघाने स्पर्धेत यशस्वी सुरुवात केली.
या स्पर्धेतील भारतीय संघाच्या पदकांची सुरुवात नेमबाजी खेळाडूंनी केली. मेहुली घोष, रमिता आणि आशी चोक्सी या त्रिकुटाने 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. मेहुली आणि रमिता अनुक्रमे द्वितीय आणि पाचव्या स्थानावर राहून वैयक्तिक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या.
त्यानंतर भारताचे दुसरे पदक रोईंगमध्ये आले. अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग यांनी लाईट वेट डबल स्कल्स प्रकारात हे पदक मिळवून दिले. त्यांनी 6.28.18 मिनिटात 2000 मीटर अंतर कापत चीनच्या मागोमाग शर्यत संपवली. त्यानंतर मेन्स कॉक्स्ड 8 संघाने सांघिक ताकदीचे प्रदर्शन घडवत जिंकले रौप्यपदक जिंकले. बाबू लाल यादव आणि लेखा राम जोडीने कॉक्सलेस पेअर स्पर्धेत जिंकले कांस्यपदक आपल्या नावे केले. 10 मीटर एअर रायफल प्रकार अंतिम फेरीमध्ये खेळलेल्या रमिता हिने कांस्यपदक जिंकून भारताच्या पारड्यात पाचवे पदक टाकले.
भारताच्या महिला क्रिकेट संघाने बांगलादेशला पराभूत करत अंतिम फेरीत जागा मिळवली. तर पुरुष हॉकी संघाने उझबेकिस्तानचा 16-0 असा धुव्वा उडवत सुरुवात केली. तर भारताचे प्रमुख बॉक्सर निखत जरीने देखील विजय सुरुवात केली. भारतीय महिला फुटबॉल संघाचे आव्हान मात्र पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. याव्यतिरिक्त भारताचा प्रमुख टेनिसपटू सुमित नागल याने उपउपांत्यपूर्व फेरीत मजल मारली.
(India Bags Five Medals At Hangzhou Asian Games 2023 Day 1)
महत्वाच्या बातम्या –
इंदोरमध्ये टीम इंडियाकडून धावांची बरसात! ऑस्ट्रेलियासमोर 400 धावांचे लक्ष
बॅटिंग ते बॉलिंग, बेन स्टोक्सने 2019च्या वर्ल्डकपमध्ये केलेला कहर; World Cup 2023मध्ये वाढणार इंग्लंडची ताकद