बुधवारी (दि. 11 ऑक्टोबर) अफगाणिस्तान संघाने जी धावसंख्या 50 षटकात उभारली, त्याचे आव्हान भारताने अवघ्या 35 षटकात गाठत विजय साकारला. विश्वचषक 2023 स्पर्धेतील 9व्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 8 विकेट्सने पराभव केला. या विजयामुळे भारताला विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे. भारताने गुणतालिकेत पाकिस्तान संघाला पछाडले आहे. चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…
भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी
अफगाणिस्तान संघाने या सामन्यात निर्धारित 50 षटकात 8 विकेट्स गमावत 272 धावसंख्या उभारली होती. हे आव्हान भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या शतकाच्या जोरावर सहजरीत्या 35 षटकातच पार केले. भारताने फक्त 2 विकेट्स गमावत 273 धावा केल्या आणि सामना 8 विकेट्सने जिंकला. या विजयानंतर भारत विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबल यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला. तसेच, पहिले स्थान न्यूझीलंडने काबीज केले आहे. भारताला विश्वचषकातील दोन्ही सामन्यात एकतर्फी विजय मिळाला आहे, त्यामुळे भारताचा नेट रनरेट खूपच चांगला झाला आहे. सध्या भारताचा नेट रनरेट +1.500 इतका आहे.
Points Table update #CWC2023 #CWC23 #CWC2023 #INDvAFG #INDvsPAK #INDvPAK #ShubmanGill #RohitSharma𓃵 #RohithSharma #ViratKohli #AUSvsSA #AUSvSA #Israel #Gaza #TrainAccident #TRAIN #trainderailed #Hamas #FreeGaza #Palestine #Bihar #BiharNews pic.twitter.com/Atk6asZNr3
— SportsPundit (@_SportsPundit) October 12, 2023
ऑस्ट्रेलियाविरुद्धही एकतर्फी विजय
पाकिस्तान संघही दोन सामने जिंकला आहे. पाकिस्तानचाही नेट रनरेट (+0.927) चांगला आहे. त्यामुळे ते पॉईंट्स टेबलमध्ये भारताच्या पुढे होते. मात्र, आता भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारत चौथ्या स्थानी होता. मात्र, आता भारताने दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानला पराभूत करत दुसरे स्थान गाठले. भारताने या विश्वचषकातील पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. भारताने या सामन्यातही 41.2 षटकात विजय साकारला होता. तसेच, अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही भारत 35 षटकातच जिंकला. त्यामुळे भारताच्या नेट रनरेटमध्ये खूपच सुधारणा झाली.
महामुकाबल्यासाठी भारत सज्ज
अशात विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील महामुकाबल्याची म्हणजेच भारत-पाकिस्तान संघातील सामन्याची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे. हा सामना येत्या 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यातही भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात कधीच पराभूत न होण्याचा विक्रम कायम ठेवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. दुसरीकडे, पाकिस्तान संघ वनडे विश्वचषकातील भारताविरुद्धच्या आपल्या पहिल्या विजयासाठी प्रयत्न करेल. (india beat afghanistan and left pakistan behind reached second place in points table world cup 2023)
हेही वाचा-
रोहितच्या शतकामुळे बनले एकापेक्षा एक विश्वविक्रम, पण सामन्यानंतर हिटमॅन म्हणाला, ‘मला माझी एकाग्रता…’
तूच खरा हिरो! आधी स्मिथ अन् आता नवीनसाठी उभा ठाकला विराट, दाखवली असामान्य खिलाडूवृत्ती