१९ वर्षाखालील विश्वचषक (icc u19 worid cup 2022) सुरू होण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. हा विश्वचषक भारतीय संघासाठी (india u19 team) चांगला जाईल, अशी पूर्ण शक्यता आहे. भारताने विश्वचषकापूर्वी त्यांचा दुसरा सराव सामना देखील जिंकला, जो ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळला गेला. भारतीय संघाने या सामन्यात ९ विकेट्स राखून विजय मिळवला. यापूर्वी भारत आणि यजमान वेस्ट इंडीज यांच्यात स्पर्धा सुरू होण्यापूर्वीचा पहिला सराव सामना खेळला गेला होता. पहिल्या सराव सामन्यात भारताने १०८ धावांनी मोठा विजय मिळवला होता. आता या दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीच धूलाई केल्याचे पाहायला मिळाले.
भारताच्या १९ वर्षाखालील संघाचा कर्णधार यश धूल याने या सामन्यात सुरुवातील नाणेफेक जिंकली आणि ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला हा निर्णय काही वेळातच योग्य ठरू लागला. ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर संघाची धावसंख्या २१ असताना तंबूत परतले. तिसऱ्या विकेटसाठी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी ५० पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली. परंतु ८३ धावसंख्या असताना ऑस्ट्रेलियाने तिसरी विकेट गमावली.
व्हिडिओ पाहा-
त्यानंतर ऑस्ट्रेलियाची चौथी विकेट ११७ धावांवर पडली. असे असले तरी, त्यांचा कर्णधार कूपर कोनोली खेळपट्टीवर एका बाजूला मजबूतीने टिकून राहिला आणि शतक पूर्ण केले. त्याच्या शतकाच्या मदतीने ऑस्ट्रेलियाने २६८ धावा केल्या.
भारतीय संघाच्या बाजूने रवी कुमारने सर्वोत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने ३४ धावा खर्च करून ४ विकेट्स घेतल्या. तसेच राजवर्धनने ३ विकेट्स घेतल्या.
गोलंदाजीनंतर जेव्हा भारतीय संघ फलंदाजीसाठी आला, तेव्हा खेळाडूंनी अप्रतिम प्रदर्शन करून दाखवले. हरनूर सिंग आणि अंग्रिश रघुवंशी यांनी १३.३ षटकांमध्ये ७४ धावा केल्या. याच धावसंख्येवर अंग्रिश रघुवंशी बाद झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाज गोलंदाजी करत राहिले, पण त्यांना पुढे एकही विकेट मिळाली नाही.
हेही वाचा- विराट कोहलीने एकमेव षटकार मारताच का होत आहे उमेश यादव सोबत तुलना? घ्या जाणून
भारतीय संघाच्या फलंदाजांनी या सामन्यात चौकारांचा वर्षाव केला. हरनूर सिंगने तब्बल १६ चौकार मारले आणि स्वतःचे शतक पूर्ण केले. शेख रसीदने ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ७४ चेंडूत ७२ धावा ठोकल्या. कर्णधार यश धूलने ७ चौकार मारले आणि ५० धावा करून नाबाद राहिला. सामन्यादरम्यान हरनूर सिंग आणि शेख राशीद रिटायर्ड हर्ट होऊन तंबूत परतले. भारतीय संघाने सामन्याच्या ४७.३ षटकात सहज लक्ष्य गाठले आणि सामना खिशात घातला.
महत्वाच्या बातम्या –
विराटला नाबाद घोषित केल्यानंतर भारत-दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार आले आमने सामने, पाहा व्हिडिओ
सिडनी कसोटीत दोन शतकांसह दणक्यात पुनरागमन करणाऱ्या ख्वाजासाठी वॉर्नर भावुक; म्हणाला, ‘स्वप्न अशीच…’
वन मॅन आर्मी! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकाकी झुंज देणाऱ्या कोहलीचे होतंय भरभरून कौतुक, पाहा खास ट्वीट्स
व्हिडिओ पाहा –