भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिका शनिवारी संपली. मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने 227 धावांनी मोठा विजय मिळवला. शेवटच्या सामन्यात इशान किशन सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली देखील मोठ्या काळानंतर वनडे क्रिकेटमध्ये शतक करू शकला. असे असले तरी, बांगलादेशने ही मालिका 2-1 अशा अंतराने नावावार केली.
उभय संघांतील या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्याचा एंकदरीत विचार केला, भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. 50 षटकांच्या या सामन्यात इशान किशन (Ishan Kishan) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी वादळी खेळी केली आणि संघाला विजय मिळवून देण्यासाठी सर्वात महत्वाचा ठरला. भारताने 8 विकेट्सच्या नुकसानावर 409 धावांचा डोंगर उभा केला, जो विरोधी संघ बांगलादेश पार करू शकला नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेश संघ 34 षटकांमध्ये 182 धावा करून सर्वबाद झाला.
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर इशान किशन भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आला होता. त्याने 126 चेंडूत द्विशतक पूर्ण केले असून सामन्यात एकूण 210 धावांची खेळी केली. या महत्वपूर्ण प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले गेले. इशानच्या साथीने विराट कोहलीने देखील शतक ठोकले. विराटने शतक पूर्ण करण्यासाठी एकूण 85 चेंडू घेतले. विराटच्या बॅटमधून या सामन्यात एकूण 113 धावा निघाल्या.
भारताने विजयासाठी देलेले 410 धावांचे लक्ष्य बांगलादेश गाठू शकला नाही. पण त्यांचा माजी कर्णधार शाकिब अल हसन याने अष्टपैलू प्रदर्शन करून दाखवले. गोलंदाजाच्या रूपात त्याने दोन विकेट्स घेतल्या, तर फलंदाजी करताना 50 चेंडूत 43 धावा केल्या. बांगलादेशने हा सामना मोठ्या अंतराने गमावला असला, तरी मालिकेतील पहिले दोन सामने मात्र त्यांनी नावावर केले होते. वनडे मालिकेतील पहिला सामना बांगलादेशने एका विकेटच्या अंतराने जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात देखील भारताला बांगलादेशने 5 धावांनी जिंकला होता. (India beat Bangladesh by 227 runs in the third ODI match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वविक्रमवीर ईशान किशन! तिसऱ्या वनडेत ठोकले वादळी द्विशतक
‘त्या’ जाहिरातीमुळे रिषभ पंतवर प्रसिद्ध गायिकेची आगपाखड; म्हणाल्या, ‘तू मूर्खासारखा दिसतोस’