भारतीय महिला हॉकी संघाने आश्चर्यकारक कामगिरी केली. शनिवारी (16 नोव्हेंबर) राजगीर हॉकी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात तिने बिहार महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024च्या साखळी टप्प्यातील शेवटच्या सामन्यात चीनचा 3-0 असा पराभव केला. भारतासाठी संगीता कुमार (32′), सलीमा टेटे (37′), आणि दीपिका (60′) यांनी गोल करत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या विजयासह भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान निश्चित केले.
सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर भारताने सुरूवातीच्या मिनिटापासून आक्रमक सुरूवात केली. सामना सुरू होताच दीपिकाने पेनल्टी कॉर्नर जिंकला, मात्र चीनची गोलरक्षक सुरोंग वूने अप्रतिम बचाव केला. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांच्या भक्कम बचावामुळे दोघांनाही गोल करण्यात यश आले नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये चीनने काउंटर अटॅकवर गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय गोलरक्षक बिचूने अप्रतिम बचाव केला. भारताला अनेकवेळा पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण त्याचा फायदा उठवता आला नाही.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने गती घेतली. 32व्या मिनिटाला सुशीलाच्या धारदार पासला संगीता कुमारीने डिफ्लेक्ट केले आणि त्याचे गोलमध्ये रूपांतर करून भारताला आघाडी मिळवून दिली. 5 मिनिटांनंतर प्रीती दुबेने शानदार ड्राईव्ह केल्यानंतर, सलीमा टेटेकडे चेंडू पास केला, तिने अचूक समाप्तीसह 2-0 अशी आघाडी घेतली. शेवटच्या क्वार्टरमध्ये चीनने आक्रमण तीव्र केले, पण भारताच्या बचावात्मक फळीने त्यांना गोल करण्याची संधी दिली नाही. शेवटच्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, तिथे दीपिकाने अप्रतिम ड्रॅग फ्लिक करत गोल केला आणि भारताला 3-0 असा निर्णायक विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीत सर्वाधिक विकेट्स घेणारे खेळाडू (टाॅप-5)
BGT; शुबमन गिलचा अंगठा फ्रॅक्चर, ‘या’ खेळाडूला मिळणार संधी?
AUS vs PAK; ऑस्ट्रेलियाने घेतला बदला! पाकिस्तानचा 2-0 ने उडवला धुव्वा