अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या चौथ्या कसोटीत भारतीय संघाने इंग्लंडला एक डाव आणि २५ धावांनी पराभूत केले. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा दुसरा डाव १३५ धावांमध्ये गुंडाळून भारताचा विजय निश्चित केला. या विजयासह भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील आपली जागा पक्की केली. या अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात संघाच्या एका कामगिरीची बरोबरी केली.
भारतीय संघाने केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जागा निश्चित केल्यानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या, सर्वाधिक वेळा आयसीसीच्या स्पर्धांच्या अंतिम फेरीत जागा मिळविण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. ऑस्ट्रेलियन संघाने आत्तापर्यंत १० दहा वेळा आयसीसीच्या स्पर्धांच्या अंतिम फेरीत जागा पटकावली होती. आता भारतीय संघाने देखील दहाव्यांदा आयसीसीच्या स्पर्धांमध्ये जागा मिळवली आहे.
ऑस्ट्रेलियन संघाने सर्वाधिक ६ वेळा वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला आहे. तसेच तीन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी तर एक वेळा टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हजेरी लावली होती. त्याचबरोबर, भारतीय संघाने चार वेळा चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना, तीन वेळा वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना तर, दोन वेळा टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला आहे. तसेच आज, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जागा पक्की केल्यानंतर भारताचा हा आकडा १० पर्यंत पोहोचला.
ऑस्ट्रेलिया व भारतानंतर या देशांचा लागते क्रमांक
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यानंतर इंग्लंड व वेस्ट इंडीजने प्रत्येकी ८ वेळा आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यात सहभाग घेतला. इंग्लंडने तीनवेळा वनडे विश्वचषकाचा, तीनवेळा चॅम्पियन्स ट्रॉफीचा तर दोनवेळा टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामना खेळला आहे. वेस्ट इंडीजने प्रत्येकी तीनवेळा वनडे विश्वचषक व चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तर, दोनवेळा टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. पाचव्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेने तीनवेळा टी२० विश्वचषकाची तर, प्रत्येकी दोन वेळा वनडे विश्वचषक व चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत हजेरी लावली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाचे अभिनंदन करताना सेहवागचे ‘हटके’ ट्विट; म्हणाला, ‘इंग्लंड अहमदाबादमध्ये हरला नाही तर…’
विराटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, कर्णधारांच्या ‘या’ यादीत पटकावले दुसरे स्थान
एबी डिविलियर्सने केले विराटचे कौतुक; म्हणाला, ‘त्याच्या नेतृत्वाने युवा क्रिकेटपटूंना….’