भारत विरुद्ध इंग्लंड संघात नुकताच कसोटी मालिकेचा पहिला सामना चेन्नई येथे पार पडला. या सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या विजयात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने द्विशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. विशेष म्हणजे हा रुटचा कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना होता. मात्र, या सामन्यानंतर इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी भारतीय संघावर जो रुटला कोणतीही भेट न देण्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहे.
खरंतर भारतीय संघाने जानेवारी २०२१ मध्ये संपलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ब्रिस्बेन कसोटी सामन्यानंतर नॅथन लायनला त्याच्या १०० व्या कसोटी सामन्याबद्दल भारतीय संघाची जर्सी भेट म्हणून दिली होती. या जर्सीवर कारकिर्दीतील १०० व्या सामन्याच्या शुभेच्छांसह सर्व भारतीय खेळांडूंनी स्वाक्षरी केलेली होती. ही जर्सी भारताचा प्रभारी कर्णधार या नात्याने रहाणेने लायनला प्रदान केली होती.
त्याप्रमाणेच यावेळी रुटही त्याचा १०० वा कसोटी सामना भारताविरुद्ध खेळत होता, असे असतानाही भारतीय संघाने त्याला मात्र कोणतीही भेट सामन्यानंतर दिली नाही. याबद्दल वॉन यांनी ट्विट करत प्रश्न विचारला आहे की ‘भारताने ब्रिस्बेन येथे कसोटी सामना जिंकल्यानंतर नॅथन लायनला खेळाडूंनी स्वाक्षरी केलेली जर्सी त्याच्या १०० व्या कसोटी सामन्यानिमित्त दिली होती. आता सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर रुटला काही दिले का? माहित नाही की त्याला अशी काही भेट मिळाली की नाही? कोणी याबद्दलची पुष्टी करु शकेल का?’
India gifted @NathLyon421 a signed shirt for his 100th Test at the end of the Gabba Win … Did @root66 receive one today after the loss ?? Not sure if it happened ? Can anyone confirm ?
— Michael Vaughan (@MichaelVaughan) February 9, 2021
रुटचे १०० व्या कसोटीत द्विशतक-
चेन्नईत झालेल्या भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीदरम्यान रुटने पहिल्या डावात ३७७ चेंडूत २१८ धावा केल्या. या खेळीत रुटने १९ चौकार आणि २ षटकार मारले. तसेच हा सामना रुटचा १०० वा कसोटी सामना असल्याने तो १०० व्या कसोटी सामन्यात द्विशतकी खेळी करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
‘कर्णधार’ रुटने केली वॉनच्या विक्रमाची बरोबरी –
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मिळवलेला विजय हा रुटचा कर्णधार म्हणून २६ वा कसोटी विजय होता. त्यामुळे त्याने इंग्लंडचा कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय मिळवण्याच्या मायकल वॉन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. वॉन यांनी देखील २००३ ते २००८ या वर्षांच्या कालावधी २६ कसोटी सामने इंग्लंडचा कर्णधार म्हणून जिंकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
क्या बात! पृथ्वी शॉ झाला उपकर्णधार, आता धडाकेबाज फटकेबाजी करुन टीकाकारांना देणार चोख उत्तर
ऐश्वर्याची मीस वर्ल्ड म्हणून निवड ते वॉर्नर-स्मिथची चोरी पकडणार अवलिया क्रिकेटर डिविलियर्स
सामना पराभूत होण्याचे मुख्य कारण कोणी क्रिकेटपटू नाही तर ‘ही’ गोष्ट, विराट आणि अश्विनचा त्रागा